पुणे : कामात टाळाटाळ करणार्‍या 76 बीएलओंची चौकशी

पुणे : कामात टाळाटाळ करणार्‍या 76 बीएलओंची चौकशी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मतदान नोंदणीच्या कामात टाळाटाळ करणार्‍या 76 मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची (बीएलओ) विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महापालिकेला दिले आहेत. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघात मात्र अत्यल्प मतदार नोंदणी झाल्याचे समोर आले होते.

प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नेमले होते. त्यांनी या कामात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी याची कडक दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी याबाबत तीव— नाराजी करीत महापालिकेच्या शाळांमधील बीएलओ म्हणून नेमणूक केलेल्या सर्व संबंधित शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतर पालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी संबंधित कर्मचार्‍यांनी त्यांचे कामकाज सांभाळून मतदान नोंदणीचे काम करायचे आहे. या कामात संबंधित कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news