नगर : चोरीच्या दुचाकी विकणारे दोघे ताब्यात

नगर : चोरीच्या दुचाकी विकणारे दोघे ताब्यात
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोन चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शहरातील चाणक्य चौक व कोठी रस्त्यावरून दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, 60 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वैभव सुरेश पठाडे (वय 26 वर्षे रा. आव्हाणे खुर्द, ता. शेवगाव), गणेश ढोल्या चव्हाण (वय 38, रा.दुधसागर सोसायटी केडगाव, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. चाणक्य चौकात व कोठी रस्त्यावर दोन जण रविवारी (ता.30) चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शोध पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

प्रत्येकी तीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव पठाडे याच्यावर कोतवाली, तोफखाना आणि शेवगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत. गणेश चव्हाण याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे. पोलिस हवालदार गणेश धोत्रे, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, बिल्ला इनामदार, संदीप थोरात, अमोल गाडे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news