India MSME Crisis: अमेरिका-इराण संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम; 11 कोटी रोजगार धोक्यात

कुटिरोद्योग ठप्प, लघुउद्योगांना फटका; निर्यात घट, कच्चा माल महागल्याने उद्योग संकटात
MSME Crisis
MSME CrisisPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे: पाच वर्षांपूर्वी कोरोनामुळे जी परिस्थिती देशात झाली होती, अगदी त्याच दिशेने जाणारे चित्र सध्या दिसत आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे देशातील ११ कोटी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या टंचाईमुळे देशातील ८० टक्के कुटिरोद्योग बंद झाले, तर ६० टक्के लघू उद्योगांना घरघर लागल्याचे चित्र आहे. मोठ्या उद्योगातील ५० ते ६० टक्के निर्यात बंद झाली असली, तरी उत्पादन मात्र सुरू आहे.

MSME Crisis
Purandar International Airport Funding Delay: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ निधीअभावी रखडला; 6 हजार कोटींची प्रतीक्षा

'असोचेम' (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया), विविध राज्यांतील चेंबर ऑफ कॉमर्स, नीती आयोगाने दिलेल्या अहवालातील हे चिंताजनक चित्र आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, आयात-निर्यातीत अडथळे, ऊर्जा (क्रूड ऑईल) महागले, पुरवठा साखळी विस्कळीत, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या ११ कोटींपेक्षा जास्त लोकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. जागतिक मंदीत ३.३ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा या क्षेत्रातील अभ्यासकांनी केला आहे.

MSME Crisis
Pune Zilla Parishad Chairman Election: जिल्हा परिषदेत सभापतिपदासाठी चुरस; 2 एप्रिलच्या निवडणुकीकडे लक्ष

'असोचेम'च्या अंदाजानुसार, कुटिरोद्योग, कच्चा माल (कापूस, लाकूड) महागले, वाहतूक खर्च वाढला, निर्यात घटली, मालाची मागणी कमी झाली, त्यामुळे देशाच्या एकूण उत्पादनात ३० टक्के घट झाली आहे. ग्रामीण उद्योग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. कारण, कच्चा माल २० ते ३० टक्क्यांनी महाग झाला आहे. तसेच, ऑटो पार्टस्, चिप, मेटल तुटवडा, टेक्स्टाईल निर्यातीत घट, रसायनांचा कच्चा माल महागला आहे.

MSME Crisis
MPSC Group A B Recruitment: MPSC भरती 2026: गट ‘अ’ व ‘ब’ साठी 571 जागा; अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्रातील उद्योगांवर परिणाम (जिल्हावार)

  • पुणे: ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर उत्पादनात घट पुणे,

  • नाशिक: ऑटोक्लस्टर

  • पिंपरी-चिंचवड: ऑटो पार्टस् निर्यात कमी टेक्स्टाईल मागणी घट

  • ठाणे: केमिकल कच्चा माल महाग रायगड पेट्रोकेमिकल तेल दरवाढ

  • नाशिक: वाईन, ऑटो उद्योगांतील निर्यात घटली

  • धुळे: कुटिरोद्योग मागणी घट छत्रपती

  • संभाजीनगर: ऑटो, फार्मा आयातीत अडथळे

  • जालना: स्टील उद्योगातील किंमत अस्थिर

  • नागपूर: लॉजिस्टिक खर्चात वाढ

  • चंद्रपूर : कोळसा मागणीत वाढ

  • यवतमाळ: कापूस दरात चढ-उतार

  • रत्नागिरी: फळ प्रक्रिया निर्यात घटली

  • सिंधुदुर्ग: पर्यटनाला मोठा फटका बसतोय

MSME Crisis
Naksha Project Maharashtra: ‘नक्शा’ प्रकल्पाला वेग; 10 शहरांमध्ये मेअखेर मिळकतपत्रिका तयार

कोणत्या उद्योगावर किती परिणाम ?

  • कुटिरोद्योग: ७५ ते ८० टक्के

  • लघू उद्योग: ५५ ते ६० टक्के

  • मोठे उद्योग: १५ ते ३० टक्के

  • टेक्स्टाईल: १५ ते २५ टक्के

  • स्टील: अस्थिर

  • ऑटोमोबाईल: १५ ते २० टक्के

  • एफएमसीजी: ५ ते १० टक्के खते,

  • रसायने: २० टक्के

  • लॉजिस्टिक: १५ ते २० टक्के

निष्कर्ष

मोठा फटका बसला घरघर सुरू झाली निर्यात बंद, उत्पादन सुरू निर्यातीत घट जागतिक किमतीत वाढ सेमीकंडक्टर तुटवडा कच्चा माल महाग आयात अवलंबित्व वाढले सेवा महागली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news