MPSC Group A B Recruitment: MPSC भरती 2026: गट ‘अ’ व ‘ब’ साठी 571 जागा; अर्ज प्रक्रिया सुरू

वैद्यकीय अधिकारी, सरकारी वकील आदी पदांसाठी संधी; 9 एप्रिल अंतिम तारीख
MPSC
MPSC Pudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ‌‘अ‌’ आणि गट ‌‘ब‌’ संवर्गातील विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 571 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन येत्या 9 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

MPSC
Naksha Project Maharashtra: ‘नक्शा’ प्रकल्पाला वेग; 10 शहरांमध्ये मेअखेर मिळकतपत्रिका तयार

पदभरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त सरकारी वकील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांसारख्या पदांचा समावेश आहे. कायद्याशी संबंधित पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेची कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. तर, वैद्यकीय पदांसाठी एमबीबीएस पदवीचो शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी इतर पात्रतेचे निकष देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार आयोगाचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपशीलवर माहिती मिळवू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि छाननीच्या आधारे निवड केली जाईल. एमपीएससीसाठी पात्रतेचे निकष पदनिहाय ठरविले जातात.

MPSC
Pune Metro Water Leakage: घरमालकाने बोअरवेलसाठी खड्डा खणला; पुणे मेट्रो बोगद्याला सहा इंचाचं भगदाड पडलं, गुन्हा दाखल

असा भरा अर्ज...

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम ाीिल. र्सेीं. ळप या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आता उमेदवारांना वेबसाइटच्या होमपेजवरील ‌‘चझडउ भरती 2026‌’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील. शेवटी, अर्ज भरल्यानंतर भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक पुन्हा नीट तपासून पाहा आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news