पुणे: दूध दरवाढीसाठी महामार्ग रोखला, निमगाव केतकीत रास्ता रोको

पुणे: दूध दरवाढीसाठी महामार्ग रोखला, निमगाव केतकीत रास्ता रोको
Published on
Updated on

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गाय व म्हशीच्या दुधाला शासनाचा हमीभाव मिळावा, खासगी दूध संघावर शासनाचे नियंत्रण हवे या प्रमुख मागण्यांसाठी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे रास्ता रोको करण्यात आला. शनिवार १० जुन रोजी बारामती-इंदापूर या राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सुमारे अर्धा तास रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

गायीच्या दुधाला ६० तर म्हशीच्या दुधाला ८० रुपये प्रतिलिटर हमीभाव मिळावा, ऊस दराप्रमाणे दुधाला ७०/३ ०चा कायदा लागू करावा, गाई-म्हशींना शासकीय विमा मिळावा, खासगी दुध संघावर शासनाचे नियंत्रण असावे, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दूध उत्पादकाला पाच रुपये लिटर शासकीय अनुदान मिळावे, पशु वैद्यकीय सेवा व हंगामी लसीकरण झाले पाहिजे, दुग्ध व्यवसायासाठी शासनाकडून विनाअट अनुदान देऊन कर्ज पुरवठा करावा, पशुपालन मेळाव्याला शासकीय प्रोत्साहन मिळावे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध संकलन केंद्रावर इलेक्ट्रिक मशीन स्विस करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, त्या संशयित दूध संकलन केंद्रावर केंद्रीय भरारी पथकाद्वारे धाडी टाकून प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग रायते, प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय म्हस्के, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोंग, प्रहार जनशक्ती दूध उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय राऊत, दादा किरकत, सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीकांत करे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिदास पवार, मंगेश घाडगे, सुनील बनसोडे, भारत शेंडे, सुरेश आदलिंग यांच्यासह दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. दुधाला दर वाढ मिळत नसल्याने कडाक्याच्या उन्हात रस्त्यावर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी विकास डोइफोडे यांनी निवेदन स्विकारले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news