NCP | सुप्रिया सुळेंच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

NCP | सुप्रिया सुळेंच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. नवीन निवडीनंतर राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करून सर्वांचे अभिनंदन केले. "या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे," असे त्यांनी म्हटलं आहे.

"भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, म्हणून भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे" असे म्हणत शरद पवार यांनी गेल्या महिन्यातच पक्षात बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर त्यांना राजीनामा मागे घ्यावा लागला. पण त्यावेळी त्यांनी पक्षाची अतिरिक्त जबाबदारी इतर नेत्यांवर देणार असल्याचे स्पष्ट केले होते. पवार यांनी आज पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांची निवड करून अखेर भाकरी फिरवली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नवीन कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्याचबरोबर खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी यांच्यावरही पक्षाची विविध जबाबदारी दिली आहे.

पक्षाच्या नवीन निवडीनंतर अजित पवार यांनी ट्विट करून सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. शरद पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!," असे त्यांनी लिहिले आहे.

अजित पवारांवर अन्याय झालेला नाही : जयंत पाटील

अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेते म्हणून मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. आम्ही सगळे एकमताचे आहोत आणि एकसंध आहोत. नव्या जबाबदारींसह नवी टीम काम करायला तयार आहे. भाकरी परतली नाही तर नवीन लोकांना जबाबदारी दिली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news