Idol Teachers Maharashtra: राज्यात 332 ‘आयडॉल शिक्षक’ निवड; शिक्षण विभागासाठी अनुभवाचा उपयोग

तंत्रज्ञानाधारित शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा शिक्षण विभागाला होणार फायदा
Teacher Recruitment
Teacher RecruitmentPudhari
Published on
Updated on

पुणे: तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे कार्य करणाऱ्या राज्यातील तब्बल 332 शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागासाठी करण्यात येणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Teacher Recruitment
Maharashtra State Cooperative Bank UPI: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ‘यूपीआय स्वीकारकर्ता बँक’; देशातील पहिली शिखर बँक

डॉ. वसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षकांची बँक तयार करण्यासाठी राज्यात ‌‘आयडॉल शिक्षक‌’ शोध प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हास्तरावरून सर्व तालुकास्तरीय याद्यांची पडताळणी करून राज्यस्तरासाठी जिल्ह्यातील 10 सर्वोत्तम शिक्षकांची यादी गुणांकनासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठविण्याच्या सूचना केलेल्या होत्या, त्यानुसार कार्यवाही करून राज्यस्तरावर 332 नामांकने प्राप्त झाली.

Teacher Recruitment
Maharashtra Sahitya Parishad Election Result: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक निकाल आज; कोणाच्या हाती जाणार सत्ता?

राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये या आयडॉल शिक्षकांचा प्रामुख्याने सहभाग घेण्यात यावा. त्यांना आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करावे. आयडॉल शिक्षकांच्या कामाचे चित्रीकरण, दस्त/अभिलेख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी करावे (उदा. ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट तयार करणे व संकेतस्थळावर प्रकाशित करणे), तसेच हे सर्व अभिलेख विद्या प्राधिकरणाला उपलब्ध करून देण्यात यावे.

Teacher Recruitment
Census 2027 Self Enumeration: जनगणना 2027 साठी मोबाईलवर स्वगणना; 1 ते 15 मेदरम्यान संधी

शिक्षण परिषदांमध्ये आयडॉल शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण, विशेष कार्याचा प्रचार-प्रसार करावा, तसेच आयडॉल शिक्षकांचे उद्बोधन ठेवावे. संबंधित आयडॉल शिक्षकांचा विविध समितीच्या बैठकांमध्ये सन्मान करणे व त्यांच्या कार्याचा लेखा-जोखा ठेवण्यासह तालुका, जिल्हा, विभागस्तरावरील विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यांमध्ये त्यांच्या कामाचा उपयोग करण्यासाठी चर्चा करावी. सर्वोत्तम दर्जाच्या शिक्षकांच्या शाळांना इतर शाळांमधील शिक्षकांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच अधिकारी यांच्या भेटींचे नियोजन करावे; तसेच इतरांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील सर्व आयडॉल शिक्षकांबाबतवरील सूचनांनुसार कार्यवाही करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा शैक्षणिक कार्यात उपयोग करून घ्यावा, असे देखील डॉ. वसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Teacher Recruitment
Egg Price Fall Poultry Industry: निर्यात घटल्याने अंड्यांचे दर घसरले; पोल्ट्री उद्योग अडचणीत

शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश

राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांची ‌‘आयडॉल शिक्षक‌’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागाला करून देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर निवड झालेल्या आयडॉल शिक्षकांच्या बाबतीत आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्यासाठी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news