HSC Certificate Distribution: बारावी प्रमाणपत्र वाटपात गोंधळ; काही विद्यार्थ्यांना सही-शिक्का नसलेली प्रमाणपत्रे

राज्य मंडळाच्या निर्देशांनंतरही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनियमितता उघड; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
HSC Certificate
HSC CertificatePudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी 3 नंतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते. या प्रमाणपत्रांचे वाटप करताना त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का आवश्यक होता. परंतु, काही कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्राचार्यांची सही आणि शिक्का नसलेल्या प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचे उघडकीस आले आहे.

HSC Certificate
Pune Property Tax Discount 2026: पुणेकरांसाठी शेवटची संधी; मिळकतकर सवलत फक्त 31 मेपर्यंत

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांतर्फे फेबुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी ऑनलाइन जाहीर केला होता.

HSC Certificate
Pune Tree Cutting Controversy: महापौर बंगल्यात 21 झाडांची कत्तल; चौकशी अहवाल महिनाभरापासून रखडला

त्यानंतर 25 मे रोजी गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि तपशीलवार गुण दर्शिवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत महाविद्यालयांना सकाळी 11 वाजता करण्यात आले. त्यानंतर दुपारी 3 पासून महाविद्यालयात संबंधित प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

HSC Certificate
Contaminated Water Vadgaon Sheri: वडगाव शेरीत दूषित पाणीपुरवठ्याचा कहर; 5 लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात

परंतु, सकाळी 11 ते दुपारी 3 यादरम्यान वेळ फारच कमी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचार्यांची सही आणि शिक्का नसलेल्या प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे काही महाविद्यालयांतील शिक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यांची ओरिजनल प्रत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा पदवी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

HSC Certificate
Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा वाहतूक कोंडीचा तिढा सुटेना; कान्हा हॉटेल चौक ते खडीमशिन चौक मार्गात हा अडथळा

प्राचार्यांची सही व शिक्का आवश्यक

राज्य मंडळाने यंदा बारावीसाठी एकच प्रमाणपत्र तयार केले आहे. अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य असलेले हे प्रमाणपत्र आगळेवेगळे आहे. परंतु, त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का गरजेचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर सही आणि शिक्का नसेल त्यांनी प्रमाणपत्र तपासून त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news