Pimpri News Update : रक्तदाब वाढवतोय हृदयाचा ठोका
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्या उच्च रक्तदाबाचा धोका वाढत चालला आहे. 30 ते 79 वयोगटात हा आजार आढळून येतो. पिंपरी-चिंचवड शहरात हृदयविकाराशी संबंधित तपासणी करणार्या येणार्या डॉक्टरांकडे सरासरी 25 ते 35 टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आढळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
डब्ल्यूएचओचा अहवाल काय सांगतो ?
जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या 78 व्या आमसभेत नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. रक्तदाबावरील जागतिक अहवाल: शर्यत सायलेंट किलरविरुद्धची नावाचा हा अशा प्रकारचा पहिलाच अहवाल आहे. या अहवालानुसार देशातील 30 ते 79 वयोगटातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा रक्तदाब नियंत्रित केल्यास 2040 पर्यंत देशात चार कोटी मृत्यू टळू शकतात. 'डब्ल्यूएचओने उच्च रक्तदाबाशी संबंधित डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे.
नियमित रक्तदाब तपासा
उच्च रक्तदाब असणार्या खूपच कमी लोकांना डोकेदुखीची समस्या जाणवते. त्यामुळे नियमित रक्तदाब तपासणे गरजेचे आहे. व्यक्तीचा सिस्टॉलिक बीपी 140 मि.मी. ऑफ मर्क्युरीपेक्षा कमी असावा. तर, डायस्टोलिक बीपी 90 मि.मी. ऑफ मर्क्युरीपेक्षा कमी असावा, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात न आणल्यास हृदयविकार, किडनी विकार, पक्षाघात, किडनी विकार यांच्यासह इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. पिंपरी -चिंचवड शहरात हृदयविकार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्या रुग्णांमध्ये उच्च्च रक्तदाब असणार्या रुग्णांचे प्रमाण वयोगटनिहाय वेगवेगळे आढळते. काही हृदयविकार तज्ज्ञांकडे 20 ते 25 टक्के तर, काही तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंतही आढळले आहे. त्याचे सरासरी प्रमाण पाहिले तर ते 25 ते 35 टक्क्यांपर्यंत आढळते.
आजाराची लक्षणे
चक्कर येणे आणि घबराट होणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. घाम येणे आणि झोपेची तीव्रता उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. उच्च रक्तदाबाचे बहुतेक वेळेस कोणतेही लक्षण जाणवत नाही. मात्र, निदान होईपर्यंत हृदय, रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांचे बरेच नुकसान झालेले असते. अनेकांना बर्याच वर्षांपासून उच्च रक्तदाब असू शकतो.
उच्च रक्तदाबाची कारणे
- अनुवंशिकता
- जेवणात मिठाचे जास्त प्रमाण
- तंबाखू, सिगारेट, कोकेन आदींचे व्यसन
- मानसिक ताणतणाव, स्थुलपणा
- किडनीशी संबंधित विकार
आजार टाळण्यासाठी काय कराल ?
- चौरस आणि सकस आहार घ्यावा.
- दररोज 45 मिनिटांचा व्यायाम करावा.
- ज्यांना नियमित व्यायाम शक्य नसेल त्यांनी आठवड्यातून किमान पाच दिवस व्यायाम करावा.
- ताणतणावांचे सुयोग्य व्यवस्थापन करावे.
- आहारातील मिठाचे प्रमाण कमी असावे.
- योगा, ध्यानधारणा, प्राणायाम करावे.
- मानसिक ताणतणाव, स्थुलपणा
- किडनीशी संबंधित विकार आजार झाल्यानंतर काय कराल ?
- वेळच्या वेळी रक्तदाब तपासणे गरजेचे आहे.
- दररोज ध्यानसाधना करावी.
- हृदय, किडनी आणि डोळ्यांशी संबंधित चाचण्या करून घ्याव्या.
हेही वाचा

