मुख्यमंत्र्यांकडून नागपूरमधील अतिवृष्टीचा आढावा, नागरिकांना सुरक्षिततेची हमी | पुढारी

मुख्यमंत्र्यांकडून नागपूरमधील अतिवृष्टीचा आढावा, नागरिकांना सुरक्षिततेची हमी

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. २३) आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली.

अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान,पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज सायंकाळी 6 वाजता अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉइंटला तसेच शहराच्या काही भागात भेट देत पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री नागपुरात येण्याची शक्यता आहे.

Back to top button