Pune Hospital News : नांदेडची आरोग्यव्यवस्था जात्यात; पुण्याची सुपात

Pune Hospital News : नांदेडची आरोग्यव्यवस्था जात्यात; पुण्याची सुपात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधील मृत्यू हे केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात, अपुर्‍या बेडची व्यवस्था, मनुष्यबळ आणि औषधांचा अभाव, राजकीय उदासीनता, यामुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थाच खिळखिळी झाली आहे. पुण्यातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचेही तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे नांदेडची आरोग्यव्यवस्था जात्यात, तर पुण्याची सुपात आहे, याकडे जनआरोग्य अभियानातर्फे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नांदेडमधील मृत्यू थैमानाच्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य अभियानाच्या सत्यशोधन समितीने प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य व्यवस्थेमधील उणिवा जाणून घेऊन सविस्तर अहवाल तयार केला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हा अहवाल निष्कर्षांसह सादर करण्यात आला. या वेळी डॉ. अभय शुक्ला, डॉ. किशोर खिलारे, शैलजा आडाळकर, विनोद शेंडे आणि दीपक जाधव उपस्थित होते.

नांदेडमधील ग्रामीण रुग्णालये, महिला रुणालय, जिल्हा रुग्णालय येथे बेडची अपुरी संख्या आणि सुविधांचा अभाव असल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्याचा चटका सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. पुण्यातही महापालिका रुग्णालयांसह ससून रुग्णालयात रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या…

नांदेडमधील घटनेचे सार्वजनिक लेखापरीक्षण करावे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन बोललावे.
राज्याचे आरोग्य बजेट दुप्पट करावे.
राज्यस्तरीय आरोग्य मानवशक्ती धोरण प्रस्थापित करावे.
पारदर्शक आणि प्रभावी औषध खरेदी प्रणाली स्वीकारावी.
कर्मचार्‍यांच्या संख्येमध्ये वाढ करावी.
पायाभूत सुविधांचा विस्तार करावा.
देखरेख आणि सामाजिक लेखापरीक्षणाची अंमलबजावणी करावी.
खासगी आरोग्यसेवा क्षेत्रातील विमा योजनांचा आढावा घ्यावा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news