Pune News : फटाका स्टॉलसाठी दुप्पट-तिप्पट दर

Pune News : फटाका स्टॉलसाठी दुप्पट-तिप्पट दर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने यंदा फटाक्यांच्या स्टॉलसाठी राबविलेल्या ऑनलाइन सोडतीत स्टॉलसाठी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट दर आले आहेत. त्यामुळे ही ऑनलाइन सोडत महापालिकेला चांगलीच फायदेशीर ठरली आहे. शहरातील मध्यवस्तीतील वर्तकबागेसह वेगवेगळ्या भागांत महापालिकेच्या जागेवर फटाका स्टॉलला परवानगी दिली जाते. या स्टॉलसाठी ऑफलाइन पध्दतीने अर्ज मागवून त्यानुसार मिळणार्‍या प्रतिसादावरून दर निश्चित केले जात होते.

त्यात नदीकाठच्या रस्त्यावर असलेल्या स्टॉलसाठी सर्वाधिक दर महापालिकेला मिळत होता. त्यात प्रामुख्याने 25 हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत प्रत्येक स्टॉलला शुल्क मिळत होते. या वर्षी मात्र पालिका प्रशासनाकडून फटाका स्टॉलसाठी ऑनलाइन पध्दतीने बोली लावण्यात आली. त्यात वर्तकबागेतील स्टॉलसाठी ज्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये भाडे मिळत होते, तेथे यंदा दोन लाख रुपयांपर्यंत बोली लावली गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

एकाही ठिकाणी एक लाख 75 हजार रुपयांच्या खाली भाडे नमूद केले गेले नाही. तर गेल्या वर्षी पाच ठिकाणी एक लाख रुपये हे सर्वाधिक भाडे महापालिकेला मिळाले होते. गेल्या वर्षी सोळा ठिकाणी 30 हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे मिळू शकले नव्हते. यंदा मात्र ऑनलाइन सोडतीमुळे भाड्यात आठपट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news