PMC Election Hadapsar Issues: कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच

रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, आरोग्य केंद्राची बिकट अवस्था; नागरिकांनी केला लोकप्रतिनिधींवर निष्क्रीयतेचा आरोप
कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासचPudhari
Published on
Updated on

प्रमोद गिरी

प्रभाग क्रमांक 16 हडपसर-सातववाडी

हडपसर गावठाण आणि परिसराचा 1998 मध्ये महापालिकेत समावेश करण्यात झाला. त्यानंतर महापालिकेच्या चार पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मात्र कोणत्याही नगरसेवकाने विकास आराखड्यात रस्त्यांचा परिपूर्ण विकास केला नाही. तसेच वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा यासह विविध समस्यांचा नागरिकांना आजही सामना करावा लागत आहे. यामुळे गेल्या काळात महापालिकेकडून कोट्यवधींचा निधी मिळूनही हा प्रभाग अद्यापही भकास असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.(Latest Pune News)

कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
Rabi Crop Sowing Pune: पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील 29 टक्के पेरण्या पूर्ण

प्रभागात वाहतुकीची समस्या गंभीर असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कमी दाबाने आणि अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या दोन कालव्यांमुळे परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्यांची दुरवस्था झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हडपसर गावठाण परिसरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नाही. भाजी मंडईची दुरवस्था, अतिक्रमणे, फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या 28 वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण का झाले नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. ससाणेनगर-हडपसर रस्त्यावर डी-मार्टजवळ 2012 साली पुलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र हे कामही अर्धवट अवस्थेत आहे

कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
Rabi Crop Sowing Pune: पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील 29 टक्के पेरण्या पूर्ण

हडपसर गावठाण परिसरासह ससाणेनगर, काळे बोराटेनगर, सातववाडी, गोंधळेनगर, विठ्ठलनगर हा भाग 1998 साली महापालिकेत समोवश करण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या चार पंचवार्षिक निवडणुका झाल्या. परंतु कोणत्याही नगरसेवकाने विकसित आराखड्यातील रस्त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हडपसर येथील आरोग्य केंद्र आणि प्रसूतिगृहाचीही दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या दोन एक जागेत सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राम मनोहर लोहिया उद्यानातील लहान मुलांच्या खेळणीचे साहित्यही नादुरुस्त झाले आहे. या साहित्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे उद्यान विभाग सांगत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट झाली असून, अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. गाडीतळ येथील मुख्य चौकात अनधिकृत रिक्षा स्टँड असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होते असून, कोंडीतही भर पडत आहे. जुन्या कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
Paragaon Road Waterlogging: पाण्यातून उठून फुफाट्यात! पारगावच्या नागरिकांचा त्रास कायम

प्रभागात या भागांचा समावेश

हडपसर गावठाण, ससाणेनगर,

काळे बोराटेनगर, गाडीतळ,

सातववाडी, गोंधळेनगर, उन्नतीनगर,

जयभवानी वसाहत, वेताळबाबा वसाहत,

पांढरेमळा वसाहत, अखिल डवरी समाज वसाहत, सातव प्लॉट, आकाशवाणी, विठ्ठलनगर,

पंधरा नंबर, अमर सृष्टी, लक्ष्मी कॉलनी आदी.

कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
ZP Election: सर्वसाधारण आरक्षणानंतर कवठे येमाई–टाकळी हाजी गटात राजकारण तापले!

प्रभागातील प्रमुख समस्या

रस्त्यांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी

कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा

रस्त्यांची झालेली दुरवस्था

दोन्ही कालव्यांना कचराकुंडीचे स्वरूप

जुन्या आणि जीर्ण झालेल्या

मलनिस्सारण वाहिन्या

हडपसर गावठाणात वाहनांसाठी पार्किंगचा अभाव

भाजी मंडईची झालेली दुरवस्था

रस्ते, पदपथांवरीले अतिक्रमणे

गेल्या 28 वर्षांपासून रस्त्यांचे रुंदीकरण रखडलेे

ससाणेनगर-हडपसर रस्त्यावर पुलाचे काम अर्धवट

कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
Teachers Online Workload: ऑनलाइन माहितीच्या तगाद्यामुळे शिक्षक त्रस्त; शिकवण्याकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचा तोटा

माननीयांना या प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

प्रभागातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि भूसंपादन होणार कधी?

अनधिकृत जाहिरातफलक हटवून परिसराचे विद्रूपीकरण थांबणार कधी?

पदपथ आणि रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त होणार कधी?

सायकल ट्रॅक आणि बीआरटीच्या दुरवस्थेकडे लक्ष देणार का?

रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन होणार तरी कधी?

जुनीच कामे नवीन भासविण्याचा प्रयत्न

नव्या प्रभागरचनेमुळे पूर्वीपेक्षा आता या प्रभागाचा विस्तार वाढला आहे. प्रभागातील विविध समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. काही माजी लोकप्रतिनिधींनी एक काम चार वेळा करून नवीन कामे केल्याचे भासवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, मिळालेल्या निधीतून प्रभागाचा शक्य तेवढा विकास केला असल्याचे माजी लोकप्रतिनिधी सांगत आहे.

कोट्यवधींचा निधी मिळूनही परिसर भकासच
ZP Election: वीर गटात शिवसेना विरुद्ध भाजप सामना : पुन्हा होणार बालेकिल्ल्याची लढत!

ससाणेनगर रस्त्यावर दुभाजक बसविल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर पदपथही नाहीत. ससाणेनगर भागातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

रवींद्र दळवी, रहिवासी

ससाणेनगर येथील गल्ली नंबर सहासह इतरही गल्ल्यांमध्ये जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनची दुरवस्था झाली आहे. यामुळे जलवाहिन्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

मनीषा शेंडकर, रहिवासी

महापालिकेचे ई-लर्निंग स्कूल, दवाखाना, अग्निशामक केंद्र, वारकरी भवन, अण्णा भाऊ साठे सभागृह, सावित्रीबाई फुले क्रीडांगण, शहीद भगतसिंग पुतळा, गाडीतळ क्लाइंडिंग सेंटर परिसरात ओपन जीम, महिलांसाठी स्वच्छतागृह, ड्रेनेज, रस्ते आदी विकासकामे केली आहेत. तसेच हडपसर गावातून जुन्या कॅनॉलवर नऊ मीटरचा पूल नव्याने बांधला.

मारुती तुपे, माजी नगरसेवक

विविध रस्ते अतिक्रमणमुक्त विकसित केले. मनपा शाळेचे मैदानाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम केले आहे. काळे बोराटेनगर परिसरात पथदिव्यांची कामे केली आहेत. दहा एकरमध्ये वनविद्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेजची कामे केली आहेत.

उज्वला जंगले, माजी नगरसेविका

ससाणेनगर येथे पंधरा गुंठे जागेत स्वर्गीय फराटे उद्यानाची निर्मिती केली. डांगमाळी मळा येथे नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी केली आहे. प्रभागातील ड्रेनेज लाइन आणि अंतर्गत रस्त्यांची कामे केली आहेत.

योगेश ससाणे, माजी नगरसेवक

सातववाडी, गोंधळेनगर परिसरात नऊ मीटर व्यासाच्या ड्रेनेज लाइनचे काम केले आहे. महापालिकेच्य रामचंद्र बनकर स्कूलमध्ये ऑडिटोरियम हॉल बांधण्यात आला. मनपा शाळेच्या अपंग मुलांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली. शहीद करकरे उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. सनी कॉलनी ते विश्वनाथ होले रस्त्यावर ड्रेनेज लाइन टाकली. विठोबा बनकर ते सोपानदादा गोंधळे या मार्गावरील जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे.

वैशाली बनकर, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news