Teachers Online Workload: ऑनलाइन माहितीच्या तगाद्यामुळे शिक्षक त्रस्त; शिकवण्याकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचा तोटा

दररोज नवे आदेश, नवीन ॲप्स आणि अहवालांचे ओझे; शिक्षणाऐवजी कागदोपत्री कामांमध्ये अडकले शिक्षक
UGC Online Degree:
ऑनलाइन माहितीच्या तगाद्यामुळे शिक्षक त्रस्तPudhari News Network
Published on
Updated on

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असताना शिक्षकांना दररोज ऑनलाइन माहिती तातडीने देण्याचा मेसेज येतो. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकाची मोठी तारांबळ उडते. त्यामुळे शिक्षकांना कायम ऑनलाइन रहावे लागते. परिणामी शिकवण्याकडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचा तोटा होतो. एकूणच शासनाच्या ऑनलाइन माहिती देण्याच्या या घाटातून शिक्षणाची वाट लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.(Latest Pune News)

UGC Online Degree:
ZP Election: वीर गटात शिवसेना विरुद्ध भाजप सामना : पुन्हा होणार बालेकिल्ल्याची लढत!

शासनाच्या दबावामुळे शिकवण्याऐवजी शिक्षक कायम ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले आहेत. यामध्ये अहवाल देणे, वेगवेगळे फॉर्म भरणे, विद्यार्थ्यांचा माहितीपूर्ण डेटा अपलोड करणे आदी कामांमुळे शिक्षकांना उसंत मिळत नाही. त्यातच केलेल्या कामाचे फोटो पाठवा म्हणजेच पुरावेही मागितले जातात. त्यामुळे शिक्षकांवर शासनाचा विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करायचा असतो. दुसरीकडे विविध दिन, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आदी कार्यक्रम साजऱ्या करण्याचे सातत्याने फतवे येतात. त्यातच ऑनलाइन माहितीही कमी वेळेत भरून मागितली जाते. यात मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा, शासन स्तरावर वेगवेगळे राबवण्यात येणारे उपक्रम, सरकारी अहवालांची जबाबदारी, माहिती गोळा करणे व वरती पाठवणे आदी कामांचा समावेश होतो.

UGC Online Degree:
Leopard Attack Ambegaon: आंबेगावात बिबट्यांचा धुमाकूळ; पिंपळगाव घोडा व महाळुंगे परिसरात सहा शेळ्या ठार

तसेच परिसरातील लोकसंख्या, तेथील भौतिक सुविधा, शिक्षणाबाहेरील मुलांची संख्या, त्या संबंधित असलेले उपक्रम आदी कामांचा भारही शिक्षकांवर लादला आहे. हे कमी की काय म्हणून सततच्या निवडणुका व त्या अनुषंगाने मतदारांची नोंदणी ते मतदान होईपर्यंत शिक्षकांना विविध जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. या कसरतीत शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे ऐवजी कार्यक्रमांची संख्या आणि माहिती देण्यातच शिक्षक अडकून पडत असल्याचे दिसून येते.

UGC Online Degree:
Watan Land Scam: वतनदार झाले कंगाल अन्‌‍ विकणारा मालामाल!

माहितीचे पुढे होते काय?

संबंधित शासकीय अधिकारी मोबाईलमधील वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळी माहिती मागवत असतात. मात्र पुढे जाऊन या माहितीचे होते काय हे मात्र न उलगडणारे कोडे असल्याचे शिक्षक सांगत आहेत.

UGC Online Degree:
ZP Election: अणे-माळशेज निवडणुकीत महिलांचा दबदबा : राजकीय समीकरणे बदलणार!

शिक्षकांबद्दल गैरसमज वाढले

शासन स्तरावर शिक्षकांना दररोज ऑनलाइन माहिती मागितली जाते. ती माहिती कायमच तातडीची व महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिक्षक सातत्याने मोबाईलमध्ये माहिती भरताना दिसतात. कधी मोबाईलला रेंज नसल्याने त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचा शिक्षकांबद्दल गैरसमज होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news