पुणे : कात्रज तळ्यातही दिसतील फ्लेमिंगो

पुणे : कात्रज तळ्यातही दिसतील फ्लेमिंगो
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : उजनी धरणाप्रमाणेच आता पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात असलेल्या तलावात जलचर पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास दिसणार आहे. आगामी काळात पर्यटकांना येथील तळ्यात फ्लेमिंगो, बदक, बगळा, राजहंस, खंड्या, पाणकोंबडी यांसारखे निसर्गात वावरणारे आणि सतत पाण्याजवळ असणारे पक्षी पाहायला मिळणार आहेत.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय 130 एकर जागेत पसरलेले आहे. त्यापैकी जवळपास 30 एकर जागेत ऐतिहासिक तलाव आहे. याच तलावामध्ये जलचर पक्ष्यांचा अधिवास असावा, याकरिता प्राणिसंग्रहालय प्रशासन प्रयत्न करणार आहे. पाण्यावर आपली उपजीविका भागविणारे आणि सातत्याने पाण्यावर राहणारे पक्षी येथील तलावात आकर्षित होतील आणि इतर ठिकाणांप्रमाणेच राजीव गांधी प्राणी संग्रहालयात देखील पर्यटकांना विविध प्रकारचे जलचर पक्षी पाहायला मिळतील, याकरिता आगामी काळात प्राणि संग्रहालय प्रशासन प्रयत्न करणार आहे.

प्राणी संग्रहालयात जलचर पक्ष्यांना जर आकर्षित करायचे असेल तर प्रशासनाला सुरुवातीला तलावात वाढत असलेली जलपर्णी कायमची काढावी लागणार आहे. तसेच, येथील ऐतिहासिक तलावात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे.

प्राणिसंग्रहालयात असलेले प्राणी

  • सस्तन प्राणी : 20 प्रजाती – 262 प्राणी
  • सरपटणारे प्राणी : 30 प्रजाती – 157 प्राणी
  • पक्षी : 12 प्रजाती – 25 पक्षी
  • प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या एकूण प्रजाती : 62
  • प्राणिसंग्रहालयातील एकूण प्राणी संख्या : 444

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news