

पुणे: मार्गशीर्ष सुरू असल्याने गणेश पेठ येथील मासळीबाजारात मासळीच्या मागणीत 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, व्यापारी वर्गाकडून कमी प्रमाणात मासळी मागविण्यात येत आहे. बाजारातील आवक जावक कायम असल्याने मासळीचे गत आठवड्यातील घटलेले दर टिकून आहेत.
थंडीमुळे वाढीची प्रक्रीया मंदावल्याने बाजारात कोंबड्यांचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मार्गशीर्षमुळे चिकनला मागणीही कमी आहे. परिणामी, त्यांचे दर टिकून आहेत. तर, उंच दरातील मागणी कमी झाल्याने गावरान अंडीच्या भावात शेकड्यामागे 50 ते 60 रुपयांनी घट झाली आहे. मटण आणि इंग्लिश अंडीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून होते.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : 1700-1900, मोठे : 1500-1700, मध्यम : 1000-1200, लहान : 800-900, भिला : 600-700, हलवा : 550-650, सुरमई 400-600, रावस : 600-800, घोळ : 700-800, करली : 250-350, करंदी : 350-400, भिंग : 350-400, पाला : 1200-1400.
वाम : पिवळी 900- 1200, काळी : 250-450, ओले बोंबील : 160-200. कोळंबी : लहान : 180-320, मोठी : 360-600, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 900-1000, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 280-320, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-240, खेकडे : 400-450, चिंबोऱ्या : 600-650. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 400-450, तांबोशी : 450-550, पालू : 250-300, लेपा : 250-300, बांगडा : 140-200, शेवटे : 250-300, पेडवी : 140-150.
बेळुंजी : 120-140, तिसऱ्या : 250-300, खुबे : 120- 160, तारली : 180-200. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 200-220, मरळ : 400-450, शिवडा : 180- 220, खवली : 200-240, आम्ळी : 120-160, खेकडे : 300-350, चिलापी : 60-160, वाम : 500-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 230, लेगपीस 280, जिवंत कोंबडी 150, बोनलेस 330. अंडी : गावरान (शेकडा) 1410, डझन 180, प्रतिनग 15. इंग्लिश (शेकडा) 700, डझन 96, प्रतिनग 8.