पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून गायब झालेली ह क्षेत्रीय कार्यालयाबाबतची माहिती गुरुवारी (दि. 22) झळकली. तसेच, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकार्यांची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेच्या ुुु. लिालळपवळर. र्सेीं. ळप संकेतस्थळावर ह क्षेत्रीय कार्यालयाची माहिती दिलेली नव्हती. तसेच, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकार्यांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती. याबाबत दैनिक 'पुढारी'ने महापालिका संकेतस्थळावरुन ह क्षेत्रीय कार्यालय गायब हे वृत्त गुरुवारी छायाचित्रासह प्रसिद्ध केले.
त्याची तातडीने दखल घेऊन महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयाची माहिती दिली आहे. क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांचे छायाचित्र, नाव, संपर्क क्रमांक व मेल आयडी देण्यात आला आहे. तसेच, ग क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे यांचे छायाचित्र व माहिती देण्यात आली आहे. संकेतस्थळावर ह व ग क्षेत्रीय कार्यालयाची माहिती दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा