पिंपरी : महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत नाही : उदय सामंत | पुढारी

पिंपरी : महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत नाही : उदय सामंत

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम असल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. तर, पंडित नेहरू, इंदिरा गांधीनंतर नरेंद्र मोदी कर्तबगार असल्याचे अजित पवार म्हणतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील या नेत्यांच्या विधानामुळे वज्रमूठ किती मजबूत आहे हे दिसते, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि.22) महाविकास आघाडीला टोला लगावला.

मंत्री सामंत गुरुवारी शहराच्या दौर्‍यावर होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ठाकरे म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत. त्यांनी मणिपूरला जावे. राष्ट्रवादीचे अजित पवार म्हणतात की, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील या नेत्यांच्या विधानामुळे वज—मूठ किती मजबूत आहे, हे दिसून येते.

मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना सरकारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षाचे आमंत्रण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनावर आहे. कोणी पक्षात यायचे, कोणाला घ्यायचे हे ते ठरविणार आहेत, ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. एकनाथ खडसे यांच्या भोसरी एमआयडीसीतील भूखंड गैरव्यवहाराबाबत भूखंड कोणता हा फार मोठा व अभ्यासाचा विषय आहे, असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.

हेही वाचा

पिंपरी : नद्यांच्या स्वच्छतेसाठी कृती आराखडा करा : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

पाणीकपात केवळ नागरिकांसाठीच का ? बिबवेवाडी परिसरातील रहिवाशांचा सवाल

‘म्हाडा’च्या पुनर्विकासात समान न्याय ; मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचे आश्वासन

Back to top button