पिंपरी : व्हिजिबल पोलिसिंग करा : आयुक्त विनयकुमार चौबे | पुढारी

पिंपरी : व्हिजिबल पोलिसिंग करा : आयुक्त विनयकुमार चौबे

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढता स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी आता मफव्हिजिबल पोलिसिंगफफवर भर देण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी (दि. 21) याबाबतचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे आगामी काळात रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस दिसून येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, महिलांची छेडछाड, विनयभंग आदी प्रकारच्या मफस्ट्रीट क्राईमफफमध्ये वाढ होत आहे. तसेच, सण उत्सव, मिरवणुका, निवडणुका, मोर्चे आणि आंदोलनाच्या वेळीदेखील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हद्दीत प्रभावी गस्त देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून आता नागरिकांना व्हिजिबल पोलिसिंग दिसून येईल. ज्यामुळे गुन्हेगारांवर तसेच समाजकंटकांवर वचक निर्माण होईल, अशी खात्री उचपदस्थ अधिकार्‍यांना आहे.

मुख्य रस्त्यावर वाहने पार्क करा

पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवरील अधिकारी, अंमलदार चारचाकी व दुचाकी वाहने गल्लीबोळात पार्क करतात. त्यामुळे नागरिकांना वाहने दिसत नाहीत. सामान्य नागरिकांना पोलिसांच्या मदतीची आवश्यकता असल्यास नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळूनदेखील वाहने वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे इथून पुढे मुख्य रस्त्यावर वाहने पार्क करावी, असे आयुक्त चौबे यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

पोलिस अधिकार्‍यांना गणवेश आवश्यक

रस्त्यावर पोलिसांचे अस्तित्व दिसून यावे, यासाठी पोलिस ठाणे येथील अधिकारी, अंमलदार कर्तव्यावर ये- जा करताना गणवेशावर राहतील, असे आयुक्त चौबे यांनी सूचित केले आहे. तसेच, कोणीही साध्या कपड्यात कर्तव्यावर येणार नाही, याची दक्षता वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक यांनी घ्यायची आहे. परिमंडळ पोलिस उपआयुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त यांनी पोलिस ठाण्यांच्या भेटीदरम्यान याबाबत खातरजमा करणे पोलिस आयुक्तांना अपेक्षित आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी सर्वंकष विचार करून व्हिजिबल पोलिसिंगवर भर देण्यात सुरुवात केली आहे. त्याचे चांगले परिणाम आगामी काळात दिसतील.

– विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

पायी गस्तही सुरूच
मागील काही दिवसांपासून शहरात पोलिसांची पायी गस्त सुरू आहे. ज्यामुळे गल्लीबोळात पोलिसांचा चांगल्या प्रकारे वावर दिसून येत आहे. मागील काही दिवसांत अपवाद वगळता रस्त्यावर मोठ्या घटना घडल्याची नोंद नाही.

हेही वाचा

पिंपरी : महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत नाही : उदय सामंत

पिंपरी : नद्यांच्या स्वच्छतेसाठी कृती आराखडा करा : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

‘म्हाडा’च्या पुनर्विकासात समान न्याय ; मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचे आश्वासन

Back to top button