पुणे : शिक्षिकेचा विनयभंग; निवृत्त पोलिसासह दोघांना अटक

पुणे : शिक्षिकेचा विनयभंग; निवृत्त पोलिसासह दोघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिक्षिकेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍यासह दोघांना चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीगाडी खाली पडल्याच्या कारणातून झालेल्या वादात हा प्रकार घडला आहे.

शरद बाबुराव पवार (वय.65) व अक्षय शरद पवार (वय.33,राहणार दोघेही विद्यानगर पोलिस लाईन नं.2 सोमनाथनगर वडगावशेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर शरद पवार यांचा दुसरा मुलगा व सुनेच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानगर येथील एका 30 वर्षीय शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. ही घटना दोन दिवसापुर्वी मंगळवारी (दि.12) रात्री 9 वाजता सोमनाथनगर वडगावशेरी येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका ह्या त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी सोमनाथनगर येथे बहीणीसह मंगळवारी गेल्या होत्या. त्यांनी दुचाकी मावशीच्या घरासमोरील रोडवर पार्क केली होती. आरोपीकडून ती खाली पडल्यामुळे फिर्यादींनी ती उचलून ठेवण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली असता, आरोपींनी फिर्यादींना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादींची बहिण भांडणे सोडविण्यासाठी आली असताना, त्यांना देखील अक्षय याने धक्काबुक्की करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

शरद पवार याने हातात दांडके घेऊन येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी ह्या त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत होत्या. त्यावेळी शरद यांचा पोलिस खात्यात असलेल्या मुलाने तो मोबाईल हिसकावून त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर शरद याने मी पोलिस आहे तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही अशी धमकी देऊन मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केेलेला व्हिडीओ डिलीट करून फिर्यादींच्या भावाकडे आणून दिला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news