Ali Budesh : दाऊद इब्राहिमला जीवे मारण्याची शपथ घेणारा गॅंगस्टर अली बुदेशचा मृत्यू | पुढारी

Ali Budesh : दाऊद इब्राहिमला जीवे मारण्याची शपथ घेणारा गॅंगस्टर अली बुदेशचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्डचा कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिमचा जानी दुश्मन म्हणून ओळखला जाणारा, त्याला जीवे मारण्याची शपथ घेणारा प्रसिद्ध गॅंगस्टर अली बुदेशची (Ali Budesh) प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे. अनेक वर्षांपूर्वीच अली बुदेश भारतातून पळून गेला होता आणि तो बहरीन येथेही राहत होता, अशी माहिती होती. २०१० साली अली बुदेशने खुलेआम इब्राहिम खान आणि त्याच्या ‘डी’ कंपनीला आव्हान दिले होते. त्यावेळी त्याने दाऊदला मारण्याची शपथदेखील घेतली होती.

इंडिया टुडेच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अली बुदेशचा मृत्यू हा प्रदीर्घ आजाराने झालेला आहे. मुंबईमध्ये राहणारा बुदेन अनेक वर्षांपूर्वीच तो भारत सोडून बहरीन देशात राहायला गेला होता. माहिती अशी आहे की, मागील काही दिवसांपासून गुप्तहेर एजन्सींना बुदेशच्या बाबतीतील माहिती मिळालेली नव्हती. आता असं सांगितले जात आहे की, बुदेशचा मृत्यू हा बहरीन येथे एक दीर्घ आजाराने झालेले आहे.”

अली बुदेशचे दाऊद इब्राहिमशी कनेक्शन काय? 

कधीकाळी दाऊद आणि बुदेश चांगले मित्र होते. पण, नंतरच्या काळात एकमेकांचा जानी दुश्मन बनले. त्यानंतर बुदेशने दाऊदला खल्लास करण्याची शपथ घेतली. दाऊद आणि शकील यांनी मुंबईच्या जान मोहम्मद नावाच्या गॅंगस्टरला मारण्यासाठी बुदेशला बहरीनला पाठविले होते. पण, तो आपल्या शपथेवर खरा उतरू शकला नाही.

२०१० मध्ये बुदेश (Ali Budesh) दाऊदला धमकी देताना म्हणाला होता की, “दाऊद इब्राहिमचा ट्रेडमार्क स्टाईल आहे. तो एका हाताने तुम्हाला भरवसा देईल आणि दुसऱ्या हाताने तुमची गोळी मारून हत्या करेल. ही त्याची स्टाईल आहे. सोप्या भाषेत जैकाल आहे. दाऊदने मला सांगितलं होतं की, तू आजरोजीपर्यंत माझा भाऊ होतास. ज्या दिवशी तुझ्यासाठी मी दाऊद इब्राहिम होईल, तेव्हा तुला जाणीव होईल. त्यावेळी मीदेखील त्याला सांगितले की, मी ही तुझा आजरोजीपर्यंतच तुझा भाऊ होतो. जेव्हा मी तुझ्यासाठी अली बुदेश होईन ना तेव्हा तू रडशील”, अशा संवादात्मक आशायच्या क्लिपचा आधार घेऊन इंडिया टुडेने त्याची बातमी केली होती.

Back to top button