South Africa floods : दक्षिण आफ्रिकेच्या डरबन प्रांतात महापुराचे थैमान; तब्बल ३४० लोकांचा मृत्यू | पुढारी

South Africa floods : दक्षिण आफ्रिकेच्या डरबन प्रांतात महापुराचे थैमान; तब्बल ३४० लोकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa floods) डरबन शहरामध्ये आलेल्या महापुरामुळे ३४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. डरबन शहर आणि क्वाजुजु-नेटल प्रांतात मुसळधार पाऊस आल्यामुळे मोठा महापूर आला त्यामुळे ३४१ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. आगामी काळात आणखी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या महापुरात मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक कुटुंब या महापुरामध्ये बेपत्ता झालेले आहेत.

South Africa floods

डरबन शहरात (South Africa floods) मोठ्या प्रमाणात पाऊत होत असल्यामुळे परिसरातील घरे, इमारती आणि रस्ते वाहून चालल्याचे चित्र आहे. इथेक्विनीचे महापौर मॅक्योलोसी कुंडा यांनी गुरूवारी सांगितले की, “किमान १२० शाळांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. ज्यामध्ये २.६ करोड डाॅलरपेक्षाही अधिक नुकसान झालेले आहे. प्रशासनाकडून या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.” शिक्षणमंत्री एंजी मोशेगा म्हणाले की, “या महापुरात विविध शाळांमधील किमान १८ विद्यार्थी आणि एक शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.”

South Africa floods

मोशेगा पुढे म्हणाले की, “या महापुरामुळे भयंकर नुकसान झालेले आहे. जर आणखी असाच मुसळधार पाऊस सुरू राहिला तर, शहाराची आणखी बिटक अवस्था होण्याची शक्यता आहे.” दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासकीय मदत अपुरी पडत असल्यामुळे डरबनच्या रिजर्ववायर टेकडीवर नागरिक आंदोलन करत आहेत. त्यांना हटविण्यासाठी स्टेन ग्रेनेडचा वापर करण्यात आला आहे. तसेच साऊथ आफ्रिकन नॅशनल डिफेन्स फोर्टही तैनात करण्यात आले आहे.

फिलीपाईन्समध्येही महापुराचा मोठा फटका

फिलिपाईन्समध्ये रविवारी ताशी ६५ किलोमीटर वेगाने आलेल्या मेगी वादळामुळे आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात भूसख्खलन झाले आहे. यामध्ये ५८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआय यांच्याकडून देण्यात आली आहे. फिलिपाईन्समध्ये वर्षाला साधारणपणे २० हून अधिक अशी वादळे येऊन धडकतात.

मेगी वादळ ताशी ६५ किलोमीटर वेगाने येऊन आग्नेह आशियायई द्विपसमुहाला धडक दिली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लेयटे प्रांतातील बेबे शहराला आणि आसपासच्या अनेक गावांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे ५० लोकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. तर बेपत्ता झालेल्यांची संख्या ही २६ पेक्षा जास्त आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button