किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना दररोज नोंदी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पुण्यात बनावट औषधे सापडल्याच्या घटनांमध्ये ही सर्व औषधे परराज्यातून खरेदी करण्यात आली होती. पुण्यात या वर्षाच्या सुरुवातीला बनावट औषधांच्या तपासण्यांमध्ये गुजरात, राजस्थान आणि बिहार राज्यांमध्ये जाऊन शहानिशा करावा लागला. प्रत्यक्षात, औषधे विकणारी कंपनीच अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले होते.– एस व्ही प्रतापवार,सहआयुक्त, एफडीए (पुणे विभाग)