Maharashtra FDA Crackdown: पुणे-बारामतीत FDAची मोठी कारवाई; पनीर तपासणी व गुटखा जप्तीने खळबळ

भेसळ अन्नाविरोधात मोहीम तीव्र; पनीरपासून गुटख्यापर्यंत धडक कारवाई सुरू
Paneer
PaneerPudhari
Published on
Updated on

खोर: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. बनावट औषधे, भेसळयुक्त खाद्यपदार्थ, ऊस गुऱ्हाळे तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर एफडीएकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.

Paneer
Kukadi Dam Water Level: कुकडी प्रकल्पात केवळ 6.99% पाणीसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली

या मोहिमेचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावरही दिसून येत असून, अनेक ठिकाणी पनीरच्या वापराबाबत सावध भूमिका घेतली जात आहे. कारवाईच्या भीतीमुळे काही हॉटेलचालकांनी पनीरपासून तयार होणारे पदार्थ तात्पुरते बंद केल्याचे दिसून येत आहे.

शाकाहारी खाद्यप्रेमींमध्ये पनीरला विशेष पसंती असते. चविष्ट आणि प्रथिनयुक्त पदार्थ म्हणून त्याची ओळख असली, तरी पनीरच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलिकडील कारवायांमधून बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पनीर विकले जात असल्याचे समोर आले आहे.

Paneer
Pune Smart School Uniform Trend: पुण्यात शाळांमध्ये ‘स्मार्ट युनिफॉर्म’चा ट्रेंड; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, बाजारात गर्दी

कृत्रिम रसायने, सिंथेटिक दूध किंवा इतर अपायकारक घटकांचा वापर करून तयार करण्यात येणारे भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अशा पनीरच्या सेवनामुळे पचनसंस्थेचे विकार, अन्नविषबाधा तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एफडीएच्या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जनजागृती वाढत असून, ग्राहकांनी खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासूनच सेवन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भेसळमुक्त आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने घेतलेली कठोर भूमिका ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Paneer
Pune Water Pipeline Burst: पौड रोडवर ड्रेनेज कामादरम्यान 16 इंच जलवाहिनी फुटली; मोठ्या प्रमाणात पाणी वाया

कारवाईमुळे खळबळ

शुद्ध शाकाहारी पदार्थ म्हणून ओळखले जाणारे पनीर आता एफडीएच्या रडारवर आले आहे. भेसळयुक्त पनीरविरोधातील कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

बारामतीत गुटखा, पानमसाला जप्त

कर्नाटकातून बारामतीत विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा अन्न व औषध विभागाने पोलिसांच्या सहकार्याने जप्त केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय 38, रा. बारामती) याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरुभेट्टीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (दि. ९) ही कारवाई करण्यात आली.

Paneer
Pune Cyber Fraud Case: पुण्यात सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार; चौघांना तब्बल 1.47 कोटींचा गंडा

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे, लक्ष्मीकांत सावळे, पंच व पोलिसांच्या उपस्थितीत बारामतीतील विश्व एम्पायर, भिगवण रोड, बारामती येथील मे. धानेश्वरी किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानात छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळला. कारवाईत विविध ब्रँडचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण ५५, २४४ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये प्रीमियम आरएमडी पानमसाला, एम सेंटेड तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखू, गुलाम गुटखा, बाजीगर गुटखा, के. आर. १००० गुटखा आदी उत्पादनांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान सदर दुकानाचे मालक व विक्रेते गुरुभेट्टी यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ कर्नाटक राज्यातून आणल्याचे सांगितले. याबाबत कोणतेही वैध खरेदी बिल अथवा कागदपत्रे सादर केली नाहीत. गुरुभेट्टीची प्रतिबंधित अन्नपदार्थांचा पुरवठादार, वाहतूकदार, वितरक व उत्पादक यांच्याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे हवालदार रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news