Pune Cyber Fraud Case: पुण्यात सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार; चौघांना तब्बल 1.47 कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंग, बिटकॉइन आणि मोबाईल ॲपच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on
Updated on

पुणे: शेअर ट्रेडिंग, बिटकॉईन गुंतवणूक आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरांनी पुण्यातील चौघांची तब्बल एक कोटी ४७ लाख ५० हजार ६७२ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Cyber Crime
Daund Robbery Case: दौंडमध्ये खोरवडी-आळेगाव परिसरात दरोड्याची धाड; 7 लाखांचा ऐवज लंपास

पहिल्या घटनेत सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी परिसरातील ४८ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. दि. १५ नोव्हेंबर ते दि. २४ डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एक कोटी १५ लाख ३२ हजार रुपये गुंतवून घेण्यात आले. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम न मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक देवकाते करत आहेत.

Cyber Crime
Pune Sahakarnagar Firing: पुण्यात सहकारनगरमध्ये मेडिकलवर गोळीबार; एक जखमी, परिसरात खळबळ

दुसऱ्या घटनेत वडगाव बुद्रुकमधील एका व्यक्तीची नऊ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. दि. ८ मे ते दि. २४ मे २०२६ या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगून सायबर चोरांनी त्यांच्याकडून रक्कम उकळली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगताप तपास करत आहेत.

Cyber Crime
Milk Adulteration Control: दूध भेसळीवर कडक कारवाईसाठी एफडीएची मोठी बैठक; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत धोरणात्मक चर्चा

तिसऱ्या घटनेत आंबेगाव बुद्रुक येथील ३१ वर्षीय तरुणाला बिटकॉईन करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १२ लाख ४४ हजार ९०० रुपयांना गंडा घालण्यात आला. हा प्रकार दि. १५ मे ते दि. २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.

Cyber Crime
School Bus CCTV Inspection: पुण्यात स्कूल बसमध्ये CCTV तपासणी मोहीम; 20 जूनपर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे RTO चे आदेश

वृद्ध नागरिकाला १० लाखांना गंडा

हिंगणे परिसरातील ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगून दि. ९ ते दि. १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नऊ लाख ९३ हजार ७७२ रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक (गुन्‍हे) गायकवाड तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news