Pune Water Pipeline Burst: पौड रोडवर ड्रेनेज कामादरम्यान 16 इंच जलवाहिनी फुटली; मोठ्या प्रमाणात पाणी वाया

कोथरूड डेपो परिसरात जेसीबीचा धक्का लागून पाणीगळती; महानगरपालिकेच्या समन्वयाअभावी नागरिक संतप्त
Water Pipeline Burst
Water Pipeline BurstPudhari
Published on
Updated on

पौड रोड: पौड रोड परिसरातील कोथरूड डेपोजवळील मेडी कॉर्नरजवळ मुख्य खात्‍यामार्फत मोठ्या व्यासाची ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या १६ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला बुधवारी (दि.१०) दुपारी तीनच्या दरम्यान जेसीबीचा धक्का लागून पाणीगळती सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. यातून महानगरपालिकेच्या दोन्ही विभागांत समन्‍वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.

Water Pipeline Burst
Pune Cyber Fraud Case: पुण्यात सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार; चौघांना तब्बल 1.47 कोटींचा गंडा

पाइपलाइन टाकण्यापूर्वी रस्त्यालगत तसेच त्या खाली कुठल्या लाइन आहेत, किती आहेत, कशाच्‍या आहेत, याची माहिती न घेताच कामे केली जातात. त्याच्या परिणामस्वरूपी अनेक वेळा पिण्याच्‍या पाण्याची पाइपलाइन तुटत असते, तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंगला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, याला जबाबदार कोण? असा संतापजनक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Water Pipeline Burst
Daund Robbery Case: दौंडमध्ये खोरवडी-आळेगाव परिसरात दरोड्याची धाड; 7 लाखांचा ऐवज लंपास

या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम करताना स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की, या ठिकाणी पाण्याचा पाइप आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेऊन जेसीबीच्या साहाय्याने काम करणे. मात्र, तसे न करता मनमानी करत भरउन्हाळ्यात पाण्याची लाइन फुटल्याने याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्‍थित होत आहे.

Water Pipeline Burst
Pune Sahakarnagar Firing: पुण्यात सहकारनगरमध्ये मेडिकलवर गोळीबार; एक जखमी, परिसरात खळबळ

आम्ही दोघा-तिघांनी जेसीबीचालकांना सांगितले होते की, त्या ठिकाणी पाण्याची लाइन आहे. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले आणि काही वेळातच ती लाइन फुटली.

उमेश खानेकर, स्थानिक नागरिक

Water Pipeline Burst
Milk Adulteration Control: दूध भेसळीवर कडक कारवाईसाठी एफडीएची मोठी बैठक; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत धोरणात्मक चर्चा

नागरिकांनी पाणी जपून वापरावे, जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर नियमित करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.

सारंग देवरे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news