जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : तावशी (ता. इंदापूर) येथील युवकाने 112 क्रमांकावर फोन करून नीरा नदीला आलेल्या पुरात तिघेजण वाहून गेल्याची खोटी माहिती दिली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दत्तात्रय नामदेव गायकवाड (वय 38, रा. तावशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड याने सोमवारी (दि. 2) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शासकीय तक्रार सुविधा डायल 112 क्रमांकावर फोन करून तावशी गावच्या हद्दीत नीरा नदीला पूर आला असून, मासे पकडणारे तिघेजण वाहून गेले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका व पोलिस पाठवा, असे सांगितले.