PMPML Palkhi Bus Service: आळंदी व देहू पालखीसाठी पीएमपीकडून जादा बससेवा; ५ ते ११ जुलै विशेष नियोजन

लाखो भाविकांसाठी शेकडो बस उपलब्ध; दिवेघाट बंद असल्याने बोपदेव घाटमार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था
PMPML Bus
PMPML BusPudhari
Published on
Updated on

​पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी आणि देहू येथे राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीकडून यंदाही नियमित बसव्यतिरिक्त शेकडो जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ५ जुलै ते ११ जुलै या कालावधीत ही विशेष सेवा उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.

PMPML Bus
Roti Ghat Palkhi Preparation: दौंडमधील रोटी घाट संत तुकाराम महाराज पालखीसाठी सज्ज; फुलांनी सजलेला घाट आकर्षण ठरतोय

आळंदी आणि देहूसाठी विशेष बसेस (५ ते ९ जुलै)

​श्रीक्षेत्र आळंदीसाठी : स्वारगेट, मनपा भवन, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी आणि चिंचवड या प्रमुख ठिकाणांवरून नियमित आणि जादा बसेस मिळून प्रतिदिनी एकूण १७९ बसेस धावतील. तसेच ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आळंदीसाठी बसेसची व्यवस्था असेल.

PMPML Bus
Pune Rural Police Wari Security: आषाढी वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक बंदोबस्त; ५ हजार पोलिस तैनात

पुणे शहरातील पालखी मुक्काम आणि प्रस्थान (११ जुलै)

​पुण्याहून ११ जुलै रोजी दोन्ही पालख्यांचे पुढील मार्गावर प्रस्थान होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत पालख्या हडपसर येथे दर्शनासाठी थांबणार असल्याने त्या भागातील गर्दी लक्षात घेऊन व्यवस्था केली आहे. ​महात्मा गांधी स्थानक (हडपसर) येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदीसाठी बसेस सुटतील. ​शिवरकर गार्डन येथून कात्रज आणि कोंढव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बससेवा असेल. ​मगरपट्टा येथून मुंढवा, चंदननगर व वाघोली भागासाठी बसेस सोडल्या जातील. पालखी सोहळा सोलापूर रोड व सासवड रोडने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर, जसा जसा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, तसतशी बस वाहतूक पूर्ववत केली जाईल.

PMPML Bus
Alandi Palkhi 2026: आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान; वारकऱ्यांसाठी जय्यत तयारी

दिवेघाट बंद; बोपदेव घाटमार्गे पर्यायी वाहतूक

​पालखी सोहळ्यादरम्यान हडपसर ते सासवडदरम्यानचा दिवेघाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. ​प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीकडून दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे बससेवा उपलब्ध केली जाईल. ​या मार्गावर स्वारगेट, पुणे स्टेशन आणि हडपसर येथून ६० जादा बसेस चालवण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली.

PMPML Bus
Maharashtra Government Books Online: महाराष्ट्र शासनाची दुर्मीळ पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध; घरपोच मिळणार शासकीय प्रकाशने

पालखी प्रस्थान दिवस (९ जुलै)चे नियोजन

​९ जुलै रोजी आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होत असल्याने भाविकांसाठी पहाटे २:३० वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर आणि मनपा येथून आळंदीसाठी १८ जादा बसेस सोडण्यात येतील. ​याशिवाय सकाळी ५:३० पासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध स्थानकांवरून नियमित मार्गावरील १५० बसेस आळंदीसाठी भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत धावतील. किमान ४० प्रवासी उपलब्ध झाल्यास प्रवाशांच्या गरजेनुसार आणखी जादा बसेसही पुरवल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news