पुणे : चाळकवाडी टोल नाक्‍यावर ‘दादागिरी’; माजी मंत्र्याच्या मुलीला फटका

चाळकवाडी येथील टोल नाक्यावर मद्यधुंद कर्मचाऱ्याने वाद घातल्यानंतर जाब विचारताना कोमल ढोबळे साळुंके.
चाळकवाडी येथील टोल नाक्यावर मद्यधुंद कर्मचाऱ्याने वाद घातल्यानंतर जाब विचारताना कोमल ढोबळे साळुंके.
Published on
Updated on

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांच्या 'दादागिरी'त वाढ झाली असून, ही दबंगगिरी स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे. दारूच्या नशेत बेधुंद असणाऱ्या टोल वसुली कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा नुकताच मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे त्यांच्या कन्या कोमल ढोबळे-साळुंके यांना अनुभवण्यास मिळाला.

सोमवारी (२० डिसेंबर) चारच्या वाजेच्या सुमारास कोमल ढोबळे-साळुंके या पुण्याच्या दिशेने जात होत्या. पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावर त्यांच्या गाडीचा तांत्रिक समस्येमुळे फास्टॅगचे स्कॅनिंग झाले नाही. यावेळी स्थानिक टोल कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांची ओळख माजी आमदार ढोबळे यांची कन्या अशी करून दिली. मात्र मद्यधुंध अवस्थेतील एका कर्मचाऱ्याने त्यांना अरेरावी केली. त्यांनी माजी आमदार ढोबळे यांचे कार्ड दाखवले असता "कोण आमदाराची लेक आम्ही ओळखत नाही" पैसे भरा आणि मगच गाडी सोडेल.'' अशी दमबाजी केली.

यावेळी त्यांनी रोख स्वरूपात टोल भरण्यासही सहमती दर्शवली; मात्र दारूच्या नशेत बेधुंद कर्मचाऱ्याने अर्वच्च  भाषेचा वापर करत तुम्ही पैसे दिले तरी गाडी सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यानंतर कोमल ढोबळे-साळुंके संतापल्या त्यांनी यावेळी टोल कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. टोल कर्मचारी माफी मागत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचा इशारा दिला. तुम्ही पैसे दिले तरी तरी गाडी सोडणार नाही अशा प्रकारे महिलेला वागणूक देता का असा सवाल विचारला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, दारूच्या नशेत बेधुंद कर्मचाऱ्यांने धूम ठोकली. बऱ्याच वेळाने तेथील एका कर्मचाऱ्याने माफी मागितली. काही प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. संबंधित व्हिडीओ कोमल ढोबळे-साळुंके यांनी सोशलमिडीयावर स्वतः पोस्ट केला आहे. आजी-माझी आमदाराच्या मुलांना जर अशी वागणूक भेटत असेल, तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news