Maharashtra Direct Second Year Admission: पदविका निकाल प्रलंबित विद्यार्थ्यांना दिलासा; थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी CET कक्षाची विशेष संधी

अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी व अर्ज निश्चितीची अतिरिक्त मुदत; निकाल प्रलंबित विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पुणे: पदविका अभ्यासक्रमाचा निकाल अद्याप प्रलंबित असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशात अडचणी येत होत्या. यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना हरकती नोंदवण्याच्या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करून अर्ज निश्चित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Admission
Pune Road Potholes: पुण्यात फक्त ५४ खड्डे शिल्लक? सजग नागरिक मंचाचा महापालिकेच्या दाव्यावर सवाल

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन सीईटी कक्षाकडून केले जाते. पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड आणि अर्ज निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती.

Admission
Pune Model School Project: पुणे महापालिकेच्या ७५ मॉडेल स्कूल प्रकल्पाला वेग; झोननिहाय स्वतंत्र निविदा प्रसिद्ध

परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाचे निकाल जाहीर न झाल्याने ते प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत होते. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी सीईटी कक्षाला प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच ईमेलद्वारे मुदतवाढीची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करत सीईटी कक्षाने हरकती सादर करण्याच्या कालावधीतच निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्ज निश्चित करण्याची अतिरिक्त संधी दिली आहे.

Admission
Pune HCMTR Project: पुण्याच्या वाहतुकीस मोठा दिलासा! एचसीएमटीआर, रिंगरोड आणि ‘पाताळलोक’ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा वेग

मात्र, या विद्यार्थ्यांना हरकती सादर करण्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करणे आणि अर्जाची निश्चिती करणे आवश्यक आहे.

Admission
Khed Market Committee Chairman Election: खेड बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक राक्षे; रणजीत गाडे उपसभापतीपदी बिनविरोध

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यास क्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यंत तर औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी २९ जुलैपर्यंत सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रिया निश्चित करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्र पडताळणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया वेळापत्रकानुसार राबवली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news