Pune Zilla Parishad Meeting Incident: पुणे जिल्हा परिषद सभेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पेट्रोलची बाटली काढून..... मोठा अनर्थ टळला

सुरक्षा व्यवस्थेवर सदस्यांचा संताप; सभागृहात पेट्रोल घेऊन महिला कशी पोहोचली? अध्यक्षांनी दिले कडक सुरक्षेचे निर्देश
Zilla Parishad Meeting Incident
Zilla Parishad Meeting IncidentPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ सभागृहात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक आणि सेवकांनी तातडीने हस्तक्षेप करून महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Zilla Parishad Meeting Incident
Maharashtra Direct Second Year Admission: पदविका निकाल प्रलंबित विद्यार्थ्यांना दिलासा; थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी CET कक्षाची विशेष संधी

ही घटना घडल्यानंतर संबंधित महिलेने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या एका सदस्याविरोधात तिने गंभीर आरोप केल्याची चर्चा सभागृहात सुरू होती. घटनेनंतर महिलेला ताब्यात घेऊन हरकणी कक्षात हलविण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात पेट्रोलची बाटली घेऊन महिला कशी पोहोचली, असा सवाल उपस्थित करत अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

Zilla Parishad Meeting Incident
Pune Road Potholes: पुण्यात फक्त ५४ खड्डे शिल्लक? सजग नागरिक मंचाचा महापालिकेच्या दाव्यावर सवाल

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यावेळी सन २०२६-२७ च्या पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

Zilla Parishad Meeting Incident
Pune Model School Project: पुणे महापालिकेच्या ७५ मॉडेल स्कूल प्रकल्पाला वेग; झोननिहाय स्वतंत्र निविदा प्रसिद्ध

सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अभिनंदन व शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच नीट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कार करण्यात आला.

Zilla Parishad Meeting Incident
Pune HCMTR Project: पुण्याच्या वाहतुकीस मोठा दिलासा! एचसीएमटीआर, रिंगरोड आणि ‘पाताळलोक’ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा वेग

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारातील संबंधित महिलेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सभागृहात सदस्यांकडून भाषणांबरोबरच रील्स चित्रीकरण केल्या जाण्याच्या प्रकारावरही आक्षेप घेण्यात आला. सभागृहातील शिस्त आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी याबाबत कठोर नियमावली करण्याची मागणी सदस्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news