पुणे : निरावागज येथेअंगावर वीज पडल्याने एकजण गंभीर

पुणे : निरावागज येथेअंगावर वीज पडल्याने एकजण गंभीर

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील निरावागज येथे बुधवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने साहेबराव नारायण पवार (वय ६०, मूळ रा. उरुळीकांचन, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना पुण्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माळेगाव पोलिस ठाण्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली. पवार हे उदरनिर्वाहासाठी आठवडाभरापूर्वीच निरावागज परिसरात आले होते. गावालगत पाल ठोकून ते कुटुंबासह राहत होते. बुधवारी रात्री वीजांच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस झाला. त्यात वीज अंगावर पडल्याने पवार हे जखमी झाले.

त्यांना रुग्णवाहिकेतून सुरुवातीला बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुण्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news