आता सामान्य लोकांनाही वापरता येणार ई-पासपोर्ट

आता सामान्य लोकांनाही वापरता येणार ई-पासपोर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये डीजिटलायझेशनवर जास्त भर देण्यात आला आहे. त्या पैकी एक म्हणजे ई पासपोर्ट सुविधा. भारतीयांना 2022-23 पासून ई पासपोर्ट वापरता येणार आहे. हा पासपोर्ट सामान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून, याच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि फ्यूचर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हा पासपोर्ट देखील पूर्वीच्या पासपोर्ट प्रमाणेच काम करणार आहे. मात्र आता यामध्ये केवळ एक चीप असेल. या ई पासपोर्ट मध्ये असलेली मायक्रोचीप प्रवाशाची माहिती रेकॉर्ड करू शकेल. या पासपोर्ट मध्ये पासवर्ड द्वारे बायोमेट्रिक डाटा भरला जाणार आहे. यामुळे जगभरात इमिग्रेशन साठी लागणारा वेळ वाचणार आहे. या पासपोर्ट ची निर्मिती नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेस मध्ये होणार आहे

ई पासपोर्ट म्हणजे नक्की काय?

ई पासपोर्ट देखील पारंपरिक जुन्या पासपोर्ट प्रमाणेच असणार आहे. मात्र यातील एम्बेडेड चीप मुळे तो अधिक सुरक्षित असेल. पूर्वी जी माहिती पासपोर्ट वर प्रिंट केली जायची ती आता इलेक्ट्रॉनिक चीप मध्ये असेल.

ई पासपोर्टची वैशिष्ट्य.

  • पासपोर्टच्या चीप मध्ये पासपोर्ट धारकाची माहिती सेव्ह असेल.
  • पासपोर्टच्या मागच्या बाजूला चौकोनी आकारातील चीप मध्ये 64 किलोबाईट स्टोरेज कॅपेसिटी असेल.
  • सुरूवातील 30 इंटरनॅशनल ट्रिप्सची त्यामध्ये माहिती साठवू शकू इतकी क्षमता असेल.
  • हळूहळू त्यामध्ये पासपोर्ट धारकाचा फोटो, बायोमेट्रिक डाटा द्वारा फिंगरप्रिंट्स देखील समाविष्ट केली असतील.
  • जर कोणी या चीपसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास तो पासपोर्ट अवैध दाखवला जाईल अशी रिपोर्ट्स ची माहिती आहे.

ई पासपोर्टचे फायदे.

  • पासपोर्ट बायोमेट्रिक डेटावर आधारित असल्याने तोअधिक सुरक्षित असणार आहे.
  • ई-पासपोर्टच्या मदतीने प्रवाशाची ओळख सुरक्षित होते आणि गोपनीयतेचेही रक्षण होते.
  • या पासपोर्टमुळे फ्रॉडसारख्या घटनांनाही आळा घालण्यास मदत होईल.
  • पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (IACO) मानकांनुसार असेल.
  • पासपोर्टवरील चिप रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे अनधिकृत डेटा प्रतिबंधित करेल.

https://youtu.be/3fSaliwKoio

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news