डॉ. अनिल रामोड प्रकरण : 2 हजारांच्या नोटाही जमा झाल्या सरकारी तिजोरीत!

डॉ. अनिल रामोड प्रकरण : 2 हजारांच्या नोटाही जमा झाल्या सरकारी तिजोरीत!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या डॉ. अनिल रामोड याने अधिकाराचा वापर करीत 2 हजारांच्या सुमारे 5 कोटींच्या नोटा तीनच दिवसांपूर्वी बदलून घरात आणून ठेवल्या होत्या. 5 कोटींच्या नोटा केवळ तीनच दिवस पाहण्याचा आनंद त्याला घेता आला. कारवाईच्या झाडाझडतीनंतर त्या सर्व नोटा सरकारी तिजोरीत जमा झाल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

हायवे लगतच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी 8 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला डॉ. अनिल रामोड विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई होण्याच्या तीन दिवस अगोदर रामोड याने सरकारी " वजन " वापरून 5 कोटींच्या 2 हजारांच्या नोटा बदलून आणल्या होत्या. अटकेनंतर सीबीआय पथकाने घेतलेल्या झाडाझडतीत सुमारे 6.5 कोटी रुपयांच्या नोटा मिळून आल्या होत्या. यात सर्व नोटा 500 रुपयांच्या असून, सर्व नोटा कडक बंडलात होत्या. नोट कडक असल्याने मोजल्या जात नव्हत्या. अखेर 2 नोटा मोजण्याच्या मशीन आणून कारवाई आटोपती घेतली गेली.

दोन वर्षांत खरेदी केलेल्या मालमत्ता तपासणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामोड याच्या पत्नीशिवाय मेहुण्याच्या व काही जवळच्या नातेवाइकांनी दोन वर्षांत घेतलेली मालमत्ता कुठून घेतली, याचा तपास केला जात आहे. मालमत्तेच्या रकमेबाबत हिशोब देता आला नाहीतर त्या मालमत्तेचे विवरण न्यायालयात सादर करून जप्त करण्याची विनंती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news