पिंपरी : सहायक उद्यान निरीक्षकानंतर उपलेखापालाचेही निलंबन

पिंपरी : सहायक उद्यान निरीक्षकानंतर उपलेखापालाचेही निलंबन

पिंपरी(पुणे) : केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एका ठेकेदाराकडून 17 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहायक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना पालिकेने 14 जूनला निलंबित केले. अखेर, त्याचा साथीदार उपलेखापाल संजय काळभोर यालाही प्रशासनाने गुरुवारी निलंबित केले. लाचप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केलेली असताना केवळ एकावर आयुक्त शेखर सिंह यांनी कारवाई केली, असे वृत्त 'पुढारी'ने 15 जूनला प्रसिद्ध केले होते. अखेर, दुसर्‍या कर्मचार्‍यावरही कारवाई करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

17 हजारांची घेतली लाच

उद्यान विभागात केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एका ठेकेदाराकडून 17 हजार रुपयांची रक्कम घेण्याचा प्रकार 7 जूनला घडला होता. दोघांपैकी केवळ मांजरे यांला 14 जूनला निलंबित करण्यात आले. काळभोर यांच्यावर कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. लाच देण्यासाठी उपलेखापाल काळभोर याने प्रोत्साहन दिले. बक्षीस म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कायदेशीर परिश्रमिकाशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे परितोषण, स्वत:साठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी स्वीकारील किंवा प्राप्त करीत तर असा अपराध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे.

काळभोर याने लाच रक्कम स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देऊन कर्तव्याप्रती नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवता लोकसेवक म्हणून पालिका कर्मचार्‍यास अशोभनीय ठरेल, असे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे. काळभोर याच्यावर भ—ष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 नुसार दाखल फौजदारी गुन्ह्याचे प्रकरण असल्याने त्याचे सेवानिलंबन करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news