पिंपरी (पुणे) : गुंतवलेल्या रकमेवर 30 टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवून आयटी अभियंत्याची 49 लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. स्नेहासिंग हृदयनारायण सिंग (35, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अधुरी गांगुली (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर लिंक पाठवली.
आपल्याकडे पार्टटाइम जॉब असून सुरुवातीला यूट्यूबवरील व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. त्यासाठी आरोपीने फिर्यादी यांना 150 आणि 350 रुपये दिले. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठे टास्क पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात 30 टक्के नफ्यासह गुंतवलेली रक्कम पाठवली जाईल, असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी तीन टास्क मध्ये एकूण 49 लाख रुपये गुंतवले. मात्र, त्यांनतर आरोपीने फिर्यादीला कोणताही नफा अथवा त्यांनी गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली.
हेही वाचा