Daund Sugarcane Price: दौंडमध्ये ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर; शेतकऱ्यांची पहिला हप्ता ४,५०० रुपयांची मागणी

गळीत हंगामापूर्वी दर जाहीर करण्याची अपेक्षा; वाढता उत्पादनखर्च आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी चिंतेत
Sugarcane
SugarcanePudhari
Published on: 
Updated on: 

राहू: दौंड तालुक्यातील ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच ऊसदराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील दौंड शुगर्स, श्रीनाथ म्हस्कोबा, ओंकार ग्रुप यवत, निराणी ग्रुप संचालित भीमा-पाटस हे चार साखर कारखाने तालुक्यातील ऊस गाळप करणार आहेत. वाढता उत्पादनखर्च आणि पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांना यंदा किमान ४ हजार ५०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. सध्या सुमारे ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये दर गुऱ्हाळघरावर मिळत असल्याचे सांगितले जात असून, उत्पादनखर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

Sugarcane
Ujani Dam Water Storage: उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव; पुणे, सोलापूर, अहिल्यानगरच्या शेतीवर संकट

दौंड तालुक्यात यंदा अनेक भागांत पाणीटंचाईचे सावट असून, आगामी तीन महिन्यांत उपलब्ध पाण्याचे काटकसरीने नियोजन करून ऊस पीक अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. पिकासाठी मोठा खर्च केल्यानंतर योग्य दर मिळाला नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.

Sugarcane
Purandar Jai Ganesh Reservoir Water Storage: पुरंदरच्या जय गणेश जलाशयात ९४ टक्के पाणीसाठा; शेतीसाठी पाणी उपसण्यास मनाई

शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी देताना संबंधित कारखाना किती दर देणार, पहिला हप्ता किती असणार आणि पुढील देयके कशी मिळणार, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. ऊसतोडणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दराची घोषणा झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या ऊस गाळपाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.

Sugarcane
Ambegaon Marigold Market Price: गणेशोत्सवात झेंडूला अवघा ३० रुपये किलो भाव; नवरात्र-दसऱ्यात दरवाढीची आशा

त्यामुळे दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कारखानदारांकडून किती दर मिळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या अनेक शेतकरी संघटना उसाचा अंतिम दर वाढावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघर्ष केला जात नसल्याने कारखानदारांचे फावले असल्याचे चित्र आहे.

Sugarcane
Pune Market Security Guard Extortion Allegation: पुणे गूळ-भुसार बाजारात वसुलीचा आरोप; सुरक्षारक्षकांकडून व्यापाऱ्याकडे ५ हजारांची मागणी

साखर कारखानदारांनी योग्य दर जाहीर करण्याची गरज आहे. वाढलेला उत्पादनखर्च, खतांच्या किमती, मजुरी, सिंचनाचा खर्च आणि सध्याची पाणीटंचाई, या सर्व बाबींचा विचार करून उसाला किमान ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता जाहीर करावा. यंदा साखरेच्या दरामध्ये विक्रमी वाढ होऊन यांचा साखर कारखान्यांना फायदा झाला आहे.

बापूसाहेब देशमुख, रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news