Purandar Jai Ganesh Reservoir Water Storage: पुरंदरच्या जय गणेश जलाशयात ९४ टक्के पाणीसाठा; शेतीसाठी पाणी उपसण्यास मनाई

पिंगोरीतील जलाशयात १८.५२ दशलक्ष घनफूट पाणी; संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी साठा राखीव
Reservoir
ReservoirPudhari
Published on: 
Updated on: 

वाल्हे: पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैअखेरीस पिंगोरी आणि कवडेवाडी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसाने दिलासा दिला आहे. पिंगोरी येथील ‘जय गणेश जलाशया’त सध्या १८.५२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Reservoir
Ambegaon Marigold Market Price: गणेशोत्सवात झेंडूला अवघा ३० रुपये किलो भाव; नवरात्र-दसऱ्यात दरवाढीची आशा

मात्र, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा साठा पिण्यासाठी राखून ठेवण्यात येणार असून, शेतीसाठी पाणी उपसू नये, असे आवाहन गराडे पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी अविनाश जगताप यांनी केले आहे.

Reservoir
Pune Market Security Guard Extortion Allegation: पुणे गूळ-भुसार बाजारात वसुलीचा आरोप; सुरक्षारक्षकांकडून व्यापाऱ्याकडे ५ हजारांची मागणी

मागील वर्षी मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने जून महिन्यातच जय गणेश जलाशय ओसंडून वाहू लागला होता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापर्यंतही जलाशयातील पाणीसाठा टिकून राहिला. दुष्काळी परिस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, गावातील रहिवासी बाबा शिंदे आणि रोटरी क्लब यांच्या प्रयत्नांतून तसेच सामाजिक संस्थांनी

Reservoir
Haveli 7 Registration Office Irregularities: हवेली-७ दुय्यम निबंधक कार्यालयातील ३४ दस्तांत अनियमितता

पुरविलेल्या यंत्रसामग्रीच्या मदतीने ग्रामस्थांनी श्रमदानातून जलाशयातील गाळ काढला होता. त्यामुळे 'जय गणेश जलाशय' पुनर्जीवित झाला. परिणामी, परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली असून, यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

Reservoir
Navratri Fasting Food Prices: नवरात्र उपवासाचे साहित्य महागले; भगरीच्या दरात वाढ, शेंगदाणा स्वस्त

शेतीसाठी पाणी उपसू नका

सर्व धरणांतील पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा वापर शेतीसाठी करू नये. हा पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. शेतकरीवर्गाने सहकार्य करावे आणि जलाशयातून चोरून पाणी उचलू नये, असे आवाहन जगताप यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news