Pune Market Security Guard Extortion Allegation: पुणे गूळ-भुसार बाजारात वसुलीचा आरोप; सुरक्षारक्षकांकडून व्यापाऱ्याकडे ५ हजारांची मागणी

मालाच्या पावत्या दाखवूनही पैशांसाठी तगादा; चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे बाजार समिती सभापतींचे आश्वासन
Pune APMC
Pune APMCPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बाजारातील व्यापारी आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकांकडूनच व्यापाऱ्यांना वसुलीसाठी वेठीस धरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात उघडकीस आला आहे. पोह्यांची गाडी भरत असलेल्या व्यापाऱ्याकडे सुरक्षारक्षकांनी तब्बल पाच हजार रुपयांची मागणी केली.

Pune APMC
Haveli 7 Registration Office Irregularities: हवेली-७ दुय्यम निबंधक कार्यालयातील ३४ दस्तांत अनियमितता

मालाच्या पावत्या दाखवूनही पैशांसाठी तगादा लावल्याने सुरक्षेच्या नावाखाली वसुली सुरू असल्याचा आरोप होत आहे. गूळ-भुसार बाजारातील प्रवेशद्वार क्रमांक एकजवळ गुरुवारी एका गाळ्यावर पोह्यांची गाडी भरण्याचे काम सुरू होते.

Pune APMC
Navratri Fasting Food Prices: नवरात्र उपवासाचे साहित्य महागले; भगरीच्या दरात वाढ, शेंगदाणा स्वस्त

त्यावेळी काही सुरक्षारक्षकांनी तेथे येऊन पाच हजार रुपयांची मागणी केली. व्यापाऱ्याने मालाच्या पावत्या दाखविल्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरूच राहिल्याचा आरोप आहे. बाजारात खासगी सुरक्षारक्षक कार्यरत आहेत.

Pune APMC
MHADA Pune Housing Lottery: म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला सर्व्हरचा अडथळा; १८ हजार कागदपत्रे पडताळणीविना

कारवाई करण्याबाबत त्यांना कोणताही अधिकार नसतानाही त्यांनी व्यापाऱ्याला गाडी कार्यालयात घेऊन जावी लागेल, असे सांगून व्यापाऱ्याकडे पैशांसाठी तगादा लावला. याप्रकरणी व्यापाऱ्याने प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. बाजाराच्या सुरक्षेसाठी नेमलेले रक्षकच वसुली करीत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune APMC
Pune Consumer Commission Builder Refund: घराचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यावसायिकाला दणका; ग्राहकाला ९ लाखांची परतफेड

सुरक्षारक्षकांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांना दंडात्मक कारवाईचा अथवा पैसे वसूल करण्याचा कोणताही अधिकार नाही. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे पैशांची मागणी होत असल्यास व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी.

प्रकाश जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news