

दौंड: दौंड शहरातील प्रसिद्ध मुद्रांक विक्रेते विवेक शंकर गटणे (रा. महादेव गल्ली, दौंड) यांनी सोमवारी( दि. ११) राहत्या घरात आत्महत्या केली. बड्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा असलेल्या काही स्थानिक राजकारण्यांच्या जाचाला कंटाळून व त्यांना दिलेले जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपये परत मिळण्याची आशा संपल्याने घटने यांनी आत्महत्या केली.
दौंड येथील एक जमीन विकून आलेले पैसे गटणे यांनी काही स्थानिक राजकारणी जमिनीचे दलाल यांच्या माध्यमातून फायनान्स कंपनीकडे लावले होते त्यातून चांगला परतावा मिळेल असे या लोकांनी गटणे यांना सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते.परंतु तसे काही होत नसल्याचे पाहून तसेच वारंवार तगादा लावूनही पैसे मिळत नाहीत असे लक्षात आल्यानंतर निराशेतून गटणे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे समजते.
याच कारणामुळे बहुदा नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांच्या बगलबच्चांना ही रक्कम दिली होती, त्याची सविस्तर नोंद त्यांनी त्यांच्या १२५ पानी पुस्तकेत केली आहे.पोलीसांनी ही पुस्तिका जप्त केली आहे. त्यामध्ये अनेकांना मोठमोठ्या रकमा सोने-चांदी दिल्याचे नमूद केले आहे,त्यांनी या वहीमध्ये काही व्यक्तींची नावे लिहिली आहेत.
१) संजय भीमराव बारवकर, २) आरिफ समशुद्दीन शेख, ३) प्रकाश आबाजी भालेराव, ४)अख्तर अहमद शेख, ५)आदित्य सुधीर जगताप, ६)वाघमारे शंकर रमेश वाघमारे, ७)नगरसेवक राजू भीमराव बारवकर, ८) शितोळे९) सोनवणे) १०) चोप्रा) ११) कुलकर्णी मॅडम) १२ शिंदे) १३) मुल्ला मुंबई यांची पूर्ण नावे नाहीत या 13 जणांवर दौंड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
यामध्ये आरोपी क्रमांक एक ते 13 यांनी विवेक गटणे यांना मागील एक वर्षापासून आमचे काही व्यक्ती फायनान्स कंपनीचे ओळखीचे अधिकारी आहेत असे सांगून गटणे यांच्याकडून पैसे, मौल्यवान वस्तू घेऊन त्या फायनल कंपनीमध्ये न ठेवता त्यांची परस्पर विल्हेवाट लावली तसेच गटणे यांनी पैसे,या मौल्यवान वस्तू मागितल्यानंतर त्यांना मारहाण देखील करण्यात आली.
मानसिक त्रास देण्यात आला व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या मृत्यूस हे तेरा व अजूनही काही जण जबाबदार आहेत असे त्यांचा मुलगा अद्वैत यांनी दौंड पोलिसांना रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे
पोलिसांनी आरोपींची नावे पत्रकारांना सुरुवातीला देण्यास टाळाटाळ केली एकंदरीतच या आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा शहरात जोरात रंगली आहे. त्यामुळे विवेक गटणे यांना नक्कीच न्याय मिळणार का? अशी चर्चा दौंड शहरात सुरू आहे आता या प्रकरणाचे पुढे काय होते हे पाहणे देखील गरजेचे आहे यातून अजून किती बडे मासे पोलिसांच्या गळ्याला लागतात हे पाहणे गरजेचे आहे.