Daund Milk Adulteration Case Investigation: दूध भेसळ रॅकेटचे धागेदोरे दौंडपर्यंत? माळवाडीतील दूध संकलन केंद्र रडारवर

श्री भैरवनाथ दूध संकलन केंद्रावर पूर्वी झाली होती कारवाई; पुरवठा साखळी आणि संशयितांची सखोल चौकशीची मागणी
Milk Adulteration
Milk AdulterationPudhari
Published on
Updated on

पाटस: जिल्ह्यातील दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या रॅकेटचे धागेदोरे दौंड तालुक्यातील पडवीजवळच्या माळवाडी येथील श्री भैरवनाथ दूध संकलन केंद्रात पोहचल्याची चर्चा सुरू आहे. तालुक्यातील संबंधित दूधसंकलन केंद्र, पुरवठासाखळी आणि या प्रकरणातील दौंड तालुक्यातील मुख्य आरोपींचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Milk Adulteration
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: निरा नदीत माउलींच्या पादुकांना शाही स्नान; ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

मंचर दूध भेसळ प्रकरणातील फिर्यादीमध्ये क्रमांक १७ वर दौंड तालुक्यातील बापूराव झगडे यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील कोणकोणत्या दूधसंकलन केंद्रांना अथवा डेअऱ्यांना त्यांनी भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य पुरवले होते का? याचा तपास विशेष तपास पथक तसेच संबंधित यंत्रणांनी करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Milk Adulteration
Pimparkhed Beer Bar Issue: पिंपरखेडमध्ये शाळेजवळ बिअर बारवरून संताप; एनर्जी ड्रिंक बंदीप्रमाणे दारू विक्रीवरही कारवाईची मागणी

श्री भैरवनाथ दूधसंकलन केंद्रावर दूधभेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून संबंधित केंद्र सील केले होते. परिसरातील काही दूधसंकलनचालक या केंद्रातून भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य घेत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून दबक्या आवाजात केली जात आहे. पडवी गावातील माळवाडी येथील श्री भैरवनाथ दूधसंकलन केंद्र हे महादेव बारवकर यांच्या जागेत कार्यरत असल्याची माहिती नागरिक देत आहेत. कारवाईदरम्यान तेथे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या युरिया खताची एक बॅग आढळून आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ती बॅग शेतीसाठीच आणल्याचे जागामालकाने सांगितल्याची माहितीसुद्धा नागरिक देत आहेत.

Milk Adulteration
Junnar Gairan Land Encroachment: जुन्नर तालुक्यात गायरान जमिनींवर अतिक्रमणाचा विळखा; शासनाकडून विशेष मोहिमेची मागणी

या बाबींची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जाणे अपेक्षित आहे. माळवाडी येथील श्री भैरवनाथ दूधसंकलन केंद्रावर दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती दूध घालणारे शेतकरी आणि ग्रामस्थ देत आहेत. या केंद्रातून मात्र सुमारे ३० हजार लिटर दूध पुढे पाठविले जात असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. या दाव्याची शासकीय स्तरावर तपासणी करून दूधसंकलन आणि पुरवठ्याच्या नोंदींची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यामधून दौंड तालुक्यातील संपूर्ण पुरवठासाखळी उघड होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

यांच्या जागेत कार्यरत असल्याची माहिती नागरिक देत आहेत. कारवाईदरम्यान तेथे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या युरिया खताची एक बॅग आढळून आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ती बॅग शेतीसाठीच आणल्याचे जागामालकाने सांगितल्याची माहितीसुद्धा नागरिक देत आहेत. या बाबींची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जाणे अपेक्षित आहे.

Milk Adulteration
Pune House Burglary: पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ; सिंहगड रोड, लोहगाव, नऱ्हेत तीन घरांना चोरट्यांचे लक्ष्य

माळवाडी येथील श्री भैरवनाथ दूधसंकलन केंद्रावर दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती दूध घालणारे शेतकरी आणि ग्रामस्थ देत आहेत. या केंद्रातून मात्र सुमारे ३० हजार लिटर दूध पुढे पाठविले जात असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. या दाव्याची शासकीय स्तरावर तपासणी करून दूधसंकलन आणि पुरवठ्याच्या नोंदींची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यामधून दौंड तालुक्यातील संपूर्ण पुरवठासाखळी उघड होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

'एफडीए'लाही मिळतेय माया

काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, दूध भेसळ प्रकरणातील आरोपी बापूराव झगडे हा दौंड तालुक्यातील अन्न व औषध प्रशासनाशी (एफडीए) संबंधित एका अधिकाऱ्याला तालुक्यातील काही दूधसंकलनचालकांकडून आर्थिक माया गोळा करून देत असल्याची चर्चा आहे. या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती प्रशासनाने जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news