

पुणे: भारतीय रक्तविज्ञानशास्र संस्था दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान समन्वयकपदावर बी.जे वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे यांच्यावर सोपवली आहे.
भारतीय रक्तविज्ञान शास्र संस्था दिल्लीचे अध्यक्ष डॉ. युद्धबीर सिंह यांनी भारतात स्वैच्छिक रक्तदान वाढवण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या उस्फुर्त रक्तदान मोहिमे अंतर्गत ही जबाबदारी बी.जे.शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रूग्णालयाचे अधिक्षक व विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे यांच्यावर सोपवली आहे.
डॉ. मुगावे हे या स्वैच्छिक रक्तदान चळवळी द्वारे भारतातील युवकांना सहभागी करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत.
या उपक्रमांमध्ये महाविद्यालये, उद्योग,आयटी कंपन्या, युनियन, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि इतर अनेक संस्थांमध्ये सामूहिक समुपदेशन आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचा समावेश असेल.
डॉ. मुगावे हे ऑल इंडिया असोसिएशन ऑफ सोशल वर्क प्रोफेशनल्स नवी दिल्ली या संस्थेच्या झोनल सेक्रेटरी म्हणून पश्चिम भारतातील सहा राज्यात त्यांच्या कामाचे कार्यक्षेत्र आहे. या वेस्ट झोन मध्ये राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश , गोवा, दिव- दमन, महाराष्ट्र, या राज्याची त्यांच्या वर जबाबदारी आहे.