

पुणे : दीड वर्षापासून फरार असलेल्या वारजे माळवाडी येथील मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या. अथर्व लक्ष्मीकांत राजमाने (रा. विघ्नहर्ता पार्क, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दि. 8 डिसेंबर रोजी खंडणीविरोधी पथक 1 चे अंमलदार रहिम शेख, अमोल आवाड व मयूर भोकरे व राजेंद्र लांडगे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे मोक्कातील आरोपी अथर्व राजमाने हा धायरी येथे ओळख लपवून राहत असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, अंमलदार सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, बालारफी शेख, नितीन बोराटे, सचिन माळवे, दयानंद तेलंगे, गीतांजली जांभुळकर यांनी ही कारवाई केली.