

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शतावरी लागवड, अश्वगंधा, सर्पगंधा, अगरबत्ती उत्पादन, बेसन पीठ गिरणी, मत्स्य करार शेती अशा विविध प्रकल्पात गुंतवणुक करण्यास भाग पाडून 200 जणांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
नामदेव काळुराम वीर (रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर ममता मनोहर यादव (रा. के. के. मार्केट) हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कविता ज्ञानदेव कोयले (27, रा. नवी पेठ, ओम बंगला) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 1 जानेवारी 2021 ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान राष्ट्र भूषण चौकातील मेगा फोर्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड येथे घडला. यावेळी संशयीत आरोपींनी त्यांना गुंतविलेल्या रकमेचे दामदुप्पट करून देतो म्हणून पैसे घेतल्याबाबत फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.