Chandanagar Murder: चंदननगरमधील तरुणाचा खून प्रेमसंबंधातील वादातून

पाच जणांना अटक; पोलिसांच्या तपासात अल्पवयीनासह पसार आरोपींचा शोध सुरू
Chandanagar Murder
Chandanagar MurderPudhari
Published on
Updated on

पुणे : नगर भागातील ऑक्सिजन पार्क येथे शनिवारी सायंकाळी झालेला प्रेम प्रकरणातून झाल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पेलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्‍या आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.

Chandanagar Murder
Purandar International Airport: चाकणमधील विमानतळाची शक्यता पूर्णत: मावळली !

लखन बाळू सकट (वय १८, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश शंकर दारकू (वय २०), यश रवींद्र गायकवाड (वय १९), जानकीराम परशुराम वाघमारे (वय १८), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९), बालाजी आनंद पेदापुरे (१९, सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) यांना अटक करण्यात आली.

Chandanagar Murder
Holedwadi Nimgaon Road Repair: आ. बाबाजी काळेंकडून रस्त्यावर उतरून पाहणी; खड्डे बुजविण्याचे काम सुरु

लखन याचे काका केशव बबन वाघमारे (वय ३२, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात वाद झाला होता. शनिवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी यशने लखनला चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावून घेतले. लखन मित्रासाेबत तेथे आला. तेव्हा यश गायकवाडने त्याच्याकडे 'मुलीशी तुझा संबंध काय आहे. तू का मध्ये पडतो', अशी विचारणा केली.

Chandanagar Murder
Indigo Airline Issue: उड्डाण उशीर, फ्लाइट रद्द, बॅगा गायब! इंडिगोच्या बेजबाबदार सेवेमुळे ताजणे कुटुंबीय हैराण

त्यानंतर यश आणि लखन यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर यश आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी लखनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. लखनवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लखनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Chandanagar Murder
Dimbhe Left Canal Water: डिंभे डावा कालवा जिवंत! कमी दाबाने पाणी, रब्बी पिकांना दिलासा

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या पाच आरोपींसह अल्पवयीनाला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. खून प्रकरणात पसार झालेल्या दोन ते तीन जणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news