Chakan Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून; पतीनेही गळफास घेऊन जीवन संपवले

चाकणजवळील कुरुळीत घरात दाम्पत्याचे मृतदेह; दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून तपास सुरू
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी (ता. खेड) गावात राहत्या घरात पती आणि पत्नीचे मृतदेह मिळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुळीमध्ये सोनवणेवस्ती रस्त्यावर एका इमारतीत राहणाऱ्या पति व पत्नी असे दोघांचे मृतदेह राहत्या घरात मिळून आले आहेत.

Crime News
Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाला अखेर गती; मार्चअखेर प्रकल्प पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

याबाबत रात्री उशिरा दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीचा खून करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. प्रियंका महादेव इगवे (वय 26) व महादेव मारुती इगवे (वय 35, दोघेही सध्या रा. कुरुळी, ता. खेड मूळ रा. केज जि. बीड) अशी मृतांची नावे आहेत.

Crime News
Pune Traffic Police: पुण्यात वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला तात्पुरती स्थगिती; कोंडी फोडण्यावरच भर

याबाबत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. 13) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी प्रियंका हिचे वडील बंडू आत्माराम धुमाळ (वय 58, रा. शिवनी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा जावई महादेव इगवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या पूर्वी घडली.

Crime News
Pune Municipal Corporation Officers: पुणे महापालिकेत अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर; प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांना झुकते माप, उपायुक्तांचा आरोप

फिर्यादी धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. 12) रात्री सव्वा अकरा ते गुरुवारी पहाटे चारच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादीचे जावई महादेव इगवे याने फिर्यादी यांची मुलगी प्रियंका हिचे कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.

Crime News
Pune Ward Committee Financial Limit: पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांना मोठे अधिकार; आर्थिक मर्यादा ५ लाखांवरून थेट २५ लाखांवर

याबाबतचा तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत. दरम्यान, ज्या खोलीत ही घटना घडली, त्याच खोलीत फरशीवर या घटनेबाबत काही मजकूर लिहिला असल्याची बाब समोर आल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news