Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाला अखेर गती; मार्चअखेर प्रकल्प पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

वीज खांब आणि दहा मालमत्तांचे भूसंपादन अद्याप रखडले; आयुक्त नवल किशोर राम यांची अधिकाऱ्यांना तंबी
Katraj Kondhwa Road Widening
Katraj Kondhwa Road WideningPudhari
Published on
Updated on

कात्रज: पुणे शहरातील बहुचर्चित आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली असून, येत्या मार्चअखेर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. मात्र, रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असलेले विजेचे खांब 'जैसे थे' असून, सुमारे दहा मालमत्तांचे भूसंपादन अद्यापही बाकी असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Traffic Police: पुण्यात वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला तात्पुरती स्थगिती; कोंडी फोडण्यावरच भर

महापालिका आयुक्तांनी या रस्त्याच्या कामाची नुकतीच पाहणी करून आढावा घेतला. या वेळी रस्त्याच्या मध्यभागी अद्यापही उभे असलेले वीजेच खांब आणि भूसंपादनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. विविध विभागांत समन्वय ठेवून हे काम वेगाने पूर्ण करा, असे निर्देश या वेळी त्यांनी कार्यकारी अभियंता धनंजय गायकवाड यांना दिले.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Municipal Corporation Officers: पुणे महापालिकेत अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर; प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांना झुकते माप, उपायुक्तांचा आरोप

राजस सोसायटी ते शत्रुंजय चौक या सुमारे १६०० मीटर लांबीच्या भागापैकी ८०० मीटर सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सुमारे १०५० मीटर पावसाळी व ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही गतीने सुरू असल्याचे या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आणि खांब अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर यांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Ward Committee Financial Limit: पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांना मोठे अधिकार; आर्थिक मर्यादा ५ लाखांवरून थेट २५ लाखांवर

माऊलीनगर येथील प्रस्तावित ग्रेडसेपरेटरच्या नकाशाचीही आयुक्तांनी माहिती घेतली. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख राजेश बनकर, कार्यकारी अभियंता धनंजय गायकवाड, उपअभियंता दिगंबर बांगर, जिल्हा भूसंपादन अधिकारी श्वेता धारूरकर, वैशाली गिरगे, नगरसेवक प्रतीक कदम, माजी नगरसेवक वसंत मोरे, राहुल टिळेकर, तुषार कदम यांच्यासह पथ, भूसंपादन, विद्युत व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Katraj Kondhwa Road Widening
Indapur Independence Day Protest: इंदापुरात स्वातंत्र्यदिनी आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन; तहसीलदारांना आंबेडकरांची प्रतिमा भेट

भूसंपादनातील त्रुटींची चौकशी करा

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाहणीदरम्यान भूसंपादन ॲवॉर्डमध्ये सुमारे दहा मालमत्तांची नावेच राहिल्याची बाब उघड झाली. संबंधित मालमत्तांचे भूसंपादन करण्यास आणखी चार-पाच महिने लागतील, असे जिल्हा भूसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर यांनी सांगितले. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत आणखी काही त्रुटी किंवा अडचणी आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण हा शहरातील पथदर्शी प्रकल्प असून, हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. त्यासाठी चालू अर्थसंकल्पात आवश्यक आर्थिक तरतूद केली आहे. कामे गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने सुरू आहेत. येत्या मार्चअखेर हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news