Pune Traffic Police: पुण्यात वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला तात्पुरती स्थगिती; कोंडी फोडण्यावरच भर

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय; ई-चलान मशीन जमा, ब्लॅक स्पॉट आणि हॉटस्पॉटवर विशेष उपाययोजना
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी, प्राणांतिक अपघात आणि त्यावरून नागरिकांकडून होणारी टीका लक्षात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक विभागाच्या कामकाजात मोठे बदल केले आहेत. गर्दीच्या वेळी वाहतूक नियमनाचे काम सोडून वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यापुढे वाहतूक पोलिसांनी प्रामुख्याने वाहतूक सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Traffic Police
Pune Municipal Corporation Officers: पुणे महापालिकेत अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर; प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांना झुकते माप, उपायुक्तांचा आरोप

पोलिस आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि. १३) शहरातील वाहतूक कोंडीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी वाहतूक विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गर्दीच्या काळात चौक सोडून वाहनचालकांवर कारवाई केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांतील दंडात्मक कारवाईचा आढावा घेतला असता बहुतांश दंडाच्या पावत्या 'अनपेड' असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व ई-चलान मशिन वाहतूक विभागात जमा केल्या आहेत. टेम्पो आणि क्रेनद्वारे होणारी कारवाईही बंद करण्यात आली आहे.

Traffic Police
Pune Ward Committee Financial Limit: पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांना मोठे अधिकार; आर्थिक मर्यादा ५ लाखांवरून थेट २५ लाखांवर

नियमभंगाची कारवाई मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरू राहणार आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी ई-चलान मशीनच्या माध्यमातून जड वाहनांची नो-एंट्री तसेच गंभीर स्वरूपाच्या नियमभंगांवर कारवाई करू शकतील. वाहतूक शिस्त, अपघात नियंत्रण आणि वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Traffic Police
Indapur Independence Day Protest: इंदापुरात स्वातंत्र्यदिनी आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन; तहसीलदारांना आंबेडकरांची प्रतिमा भेट

रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढणार

वाहतूक विभागाच्या प्रभारींनी प्रमुख चौक आणि कोंडीच्या ठिकाणी अधिकाधिक कर्मचारी नियुक्त करावे. कोणताही अंमलदार कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. सोमवार आणि शुक्रवार या दिवशी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देऊ नये, असेही निर्देश आहेत. सायंकाळी किंवा रात्री कोंडी झाल्यास ती पूर्णपणे सुटेपर्यंत संबंधित चौकी प्रभाऱ्यांनी आपल्या हद्दीत राहून वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे.

'ब्लॅक स्पॉट', 'हॉटस्पॉट'वर उपाययोजना

अपघातप्रवण 'ब्लॅक स्पॉट' निश्चित करून तेथे अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक वाहतूक विभागाने आपल्या हद्दीतील वाहतूक कोंडीचे 'हॉटस्पॉट' शोधून त्यामागील कारणांचा अभ्यास करायचा आहे. सिग्नलच्या वेळेचा अभ्यास, सिग्नल सिंक्रोनायझेशन, कॉर्नर पार्किंगला आळा आणि चौकात ऑटोरिक्षा उभ्या राहण्यास प्रतिबंध अशा उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे.

Traffic Police
Pune Municipal Corporation Loan: पुणे महापालिका १,१६७ कोटींचे कर्ज घेणार; पाणी, पूरनियंत्रण अन् मलनिस्सारण प्रकल्पांना गती

'ड्रंक अँड ड्राइव्ह'वर बॉडी कॅमेऱ्याची नजर

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरील कारवाई अधिक नियोजनबद्ध करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली कारवाईची ठिकाणे निश्चित केली जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, कारवाईदरम्यान बॉडी कॅमेऱ्याचा वापर करावा लागणार आहे. एकाच कर्मचाऱ्याची वारंवार त्याच ठिकाणी नियुक्ती न करता ड्युटी रोटेशन करण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी 'डमी डिकॉय' पाठवून कारवाईची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेशही पोलिस उपायुक्त, मुख्यालय यांना देण्यात आले आहेत.

सात परिमंडळांसाठी आपत्कालीन पथके

शहरातील प्रत्येक सात परिमंडळासाठी दोन मोटारसायकलींवर वाहतूक शाखेतील चार अंमलदारांचे आपत्कालीन पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत पथकांना तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news