

शंकर कवडे
पुणे: दिवाळीचा आनंद परदेशात असलेल्या मुलापर्यंत पोहोचावा, या भावनेतून पुण्यातील एका वडिलांनी फराळ कुरिअर कंपनीमार्फत अमेरिकेत पाठविले. ‘29 ऑक्टोबरपर्यंत फराळ मुलापर्यंत पोहोचेल’ असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात पार्सल अनेक दिवस मुंबईतच अडकून राहिले आणि पाच दिवस उशिराने अमेरिकेत पोहोचले.
तोपर्यंत फराळातील सर्व पदार्थ खराब झाले होते. मुलासाठी प्रेमाने पाठविलेला फराळ वाया गेल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी ग््रााहक आयोगात धाव घेतली. अन् आयोगानेही वडिलांच्या बाजूने निकाल देत कुरिअर कंपनीने तक्रारदारास 13434 रुपये व्याजासह तसेच 7 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 500 रुपये तक्रार खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात, बाणेर येथील शरद मानकर यांनी नारायण पेठ येथील यु. डी. एक्स. वर्ल्डवाईड या कुरिअर कंपनीविरुद्ध तक्रार दिली होती. त्यांनी 22 ऑक्टोबर 2024 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणारा मुलगा अमेयला दिवाळीचा फराळ व मिठाई पाठविली होती. फराळासाठी 2564 रुपये आणि कुरिअरसाठी 10870 रुपये भरले होते. कंपनीकडून हे पार्सल 28 किंवा 29 ऑक्टोबरपर्यंत पोहोचेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे पार्सल 2 नोव्हेंबरला अमेरिकेत पोहोचले. यादरम्यान पार्सलला ट्रॅक केले असता, ते तपासात कोठेही मिळाले नाही. तसेच, पार्सल मिळाल्यानंतर सर्व खाद्यपदार्थ खराब झाले होते. याबाबत मानकर यांनी कुरिअर कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु, कंपनीने 5 हजार देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मानकर यांनी ग््रााहक आयोगात धाव घेतली.
वेळेत वस्तू पोहोचण्यासाठीच मोजली जाते मोठी रक्कम
एखादी व्यक्ती परदेशी असणाऱ्या आपल्या नातेवाइकास कुरिअरद्वारे काही वस्तू पाठवते. तेव्हा त्या व्यक्तीची एवढीच साधारण अपेक्षा असते की, सदर वस्तू अथवा पदार्थ संबंधित व्यक्तीला ठराविक कालावधीत मिळावेत. त्यानुसार, कुरिअर कंपनीने कुरिअर करण्यासाठी आकारलेली प्रचंड मोठी रक्कम देण्यास देखील ते तयार असतात. याप्रकरणात, थोडी नव्हे, तर 10 हजार 870 रुपये मोजण्यात आले. जेव्हा एखादी सेवा रक्कम घेऊन पुरविण्याचे आश्वासन दिले जाते. तेव्हा त्या सेवेमध्ये कोणताही दोष अथवा कोणतीही त्रुटी ठेवणे उचित ठरत नाही, असे ग््रााहक आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर आणि सदस्या शुभांगी दुनाखे यांनी स्पष्ट केले.
ग््रााहकाने ठराविक वेळेत सेवा मिळेल या विश्वासावर मोठी रक्कम मोजलेली असते. पार्सल वेळेत पोहोचले नाही आणि त्यातील पदार्थ खराब झाले, तर ती सेवेमधील त्रुटी ठरते. ग््रााहक आयोगाचा हा निर्णय ग््रााहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा असून, सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याचा स्पष्ट संदेश देणारा आहे. यास्वरूपाच्या अडचणी टाळण्यासाठी ग््रााहकांनी विश्वासार्ह सेवेचा अवलंब करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
ॲड. योगेश जैन, कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन