Rajgad Forest Wildlife Water Crisis: राजगड वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे; वन्यजीवांवर पाण्याचे संकट

निधीअभावी 50 हून अधिक पाणवठ्यांत पाणी नाही; वन्यजीवांवर पाण्याचे गंभीर संकट
Rajgad Forest Water Crisis
Rajgad Forest Water CrisisPudhari
Published on
Updated on

खडकवासला: राजगड तालुक्यातील वनक्षेत्रातील पन्नासहून अधिक पाणवठे वारंवार मागणी करूनही निधी मिळत नसल्याने कोरडे ठणठणीत पडले आहेत. दुसरीकडे उन्हाची तीवता वाढल्याने जंगल वनक्षेत्रातील वन्यजीवांचे पाण्याअभावी हाल सुरू आहेत.

Rajgad Forest Water Crisis
Pune Delayed Courier Compensation: दिवाळी फराळ उशिरा पोहोचला; कुरिअर कंपनीला भरपाईचे आदेश

घनदाट जंगल आणि विविध जातींच्या दुर्मीळ पक्षी, वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या राजगड तालुक्यातील राजगड तोरणा, पानशेत घिसर, पासली, वरोती, सिंगापूर आदी वनक्षेत्रातील हजारों वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. डोंगर, जंगलातील चारा, गवत खाद्य भीषण वणव्यात जळून खाक झाले आहेत. त्यामुळे खाद्य, पाण्यासाठी वन्यजीव मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. हरीण, ससे, कोल्हे, माकड, मोर, चितळ, सांबर आदी वन्यजीव खाद्य पाण्यासाठी गुंजवणी, पानशेत, वरसगाव धरणाच्या पाणलोटावर येत आहेत.

Rajgad Forest Water Crisis
PMC Khadakwasla Water Dues: खडकवासला पाणीपट्टीची 948 कोटी थकबाकी

वनक्षेत्रालगतच्या डोंगर टेकड्या नष्ट करून मोठ्या प्रमाणात बांधकामे, रस्ते, प्लॉटिंगचे सामाज्य पसरले आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असताना वन्यजीवांसाठी वन विभागाने वनक्षेत्रात, जंगलात बांधलेल्या कृत्रिम पाणवठे, वनतळ्यात पाणी सोडण्यासाठी राजगड तालुका वन विभागाकडे निधीच उपलब्ध नाही. मार्च महिना आता अर्धा संपला तरी अद्यापही एकाही तळ्यात थेंबभरही पाणी टाकले नाही.

Rajgad Forest Water Crisis
Maharashtra LPG Cylinder Shortage: राज्यात एलपीजी सिलिंडर टंचाई; प्राधान्याने पुरवठ्याचे आदेश

भोर्डी, केळद आदी ठिकाणी वन विभागाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली वनतळी कोरडी ठणठणीत आहेत. हजारो पक्षी, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. कावळे, चिमणी, सुतारपक्षी, मोर, लांडोर, माकड, ससे आदी वन्यजीवांची संख्या कमी झाली आहे. निधी उपलब्ध वनांमधील पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी पशुप्रेमी आणि ग््राामस्थांकडून होत आहे.

Rajgad Forest Water Crisis
SPPU Gas Shortage Mess: गॅसटंचाईचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खानावळींवर परिणाम

यंदा दिवाळीपासूनच उन्हाची तीवता अधिक आहे. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे डिसेंबरमध्येच कोरडे पडले. वरघड, मोसे, आंबेगाव, पासली भागातील जंगलात थेंबभर पाणी नाही.

विनोद दिघे, ग््राामस्थ, वेल्हे खुर्द

शासनाकडे पाठपुरावा करूनही वन तळ्यात तसेच पाणवठ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या वन्यजीवांची शिकार होणार नाही. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी, वनरक्षकांना सूचना दिल्या आहेत.

अनिल लांडगे, वन परिमंडळ अधिकारी, राजगड तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news